शफाचा हा कारखाना केवळ व्यवसायापुरता मर्यादित नाही, तर गावातील अनेक गरजू, गरीब आणि निराधार महिलांसाठी तो आशेचा किरण ठरला आहे. अनेक अशा महिला, ज्या पूर्वी शेतात मजुरी करत होत्या किंवा घरातच बेरोजगार बसल्या होत्या, त्यांना शफाने रोजगार दिला आहे.
शफा मोफत प्रशिक्षण देऊन महिलांना बनवते सक्षम
गावाच्या पाच किलोमीटरच्या परिघातल्या महिलांना शफा मोफत प्रशिक्षण देते. विशेष म्हणजे प्रशिक्षणाच्या काळातही महिलांना थोडे पैसे दिले जातात, जेणेकरून त्यांचा आत्मसन्मान टिकून राहावा. एकदा का काम शिकून झाले की, या महिलांना दररोज किंवा मासिक पद्धतीने पगार दिला जातो. गावातल्या अनेक महिला लग्नानंतर घराबाहेर पडत नाहीत, त्यांचाही विचार करून शफा त्यांना घरीच काम देते. लग्नसराईच्या हंगामात जेव्हा लाखाच्या बांगड्यांची मागणी वाढते, तेव्हा अधिक महिलांना घरूनच काम देण्यात येते.
advertisement
करोनात नोकरी गेली, आणि सुरू झाला ‘लाखाचा’ प्रवास
शफा एकेकाळी आयटी कंपनीत चांगल्या पगाराच्या नोकरीत होती. पण करोना काळात तिला ती नोकरी सोडावी लागली आणि मग ती गावात परतली. शहरातून गावात आल्यावर तिने स्वतःचं काही तरी सुरू करण्याचा निर्णय घेतला. आणि तिने सुरू केला ‘लाख क्लस्टर’. या व्यवसायाची सुरुवात करताना शफाने गावातील अशिक्षित, गरीब, निराधार महिलांना एकत्र बोलावलं आणि त्यांना विचारलं - "एक कंपनी सुरू करणार आहे, काम कराल का?" सुरुवातीला महिलांना काहीही माहिती नव्हतं, पण शफाने त्यांना प्रशिक्षण दिलं. आज याच महिला महिन्याला 5 ते 10 हजार रुपये कमावत आहेत.
हे ही वाचा : महिलेची कमाल! घरात बसून उभ केलं लाखोंचं साम्राज्य, व्यवसाय ऐकून तुम्हीही सुरू कराल 'हा' बिझनेस
हे ही वाचा : महिलांनो इकडे लक्ष द्या! फक्त 50000 रुपयांत सुरू करा 'हा' बिझनेस; होते जबरदस्त कमाई