हितेशचे वडील सुपरवायझर म्हणून काम करु लागले. आई घर चालवण्यासाठी शिवणकाम केलं. परिस्थिती खूप कठीण होती, पण हितेशची स्वप्ने मात्र मोठी होती. त्यासाठी त्याने रात्रीचाही दिवस केला. दहावीत असतानाच त्याने 'मला सीए (CA) व्हायचे आहे हे मानशी पक्कं केलं. जेव्हा हितेशने सीए होण्याचे आपले स्वप्न सांगितले, तेव्हा लोकांनी त्याला हे परिस्थितीमुळे शक्य होणार नाही असा सल्ला दिला. पण त्याने कोणाचेही ऐकले नाही आणि रोज सलग १२ तास अभ्यास सुरू केला.
advertisement
या प्रवासात त्याची आई हंसाबेन यांची साथ खूप मोलाची ठरली. आई दररोज रात्री हितेशसोबत जागी राहायची आणि त्याला सतत मनोबल वाढवण्यासाठी प्रयत्न करायची. या कठोर परिश्रमाचे फळ म्हणून हितेशने पहिल्याच प्रयत्नात सीए फाउंडेशन आणि इंटरमीडिएट या दोन्ही परीक्षा उत्तीर्ण करून दाखवल्या. त्याने हे सिद्ध केले की, जर ध्येयावर नजर पक्की असेल, तर परिस्थिती कितीही बिकट असो, मेहनत आणि आई-वडिलांचा विश्वास नेहमी विजयी होतो.
बनासकांठाच्या धनेरा तालुक्याचे मूळ रहिवासी असलेले आणि सध्या नवसारीत राहणारे हितेशचे वडील उत्तमसिंह राजपूत हे पूर्वी हिऱ्यांच्या व्यवसायात काम करत होते. मात्र, हिऱ्यांच्या व्यवसायात आलेल्या मंदीमुळे त्यांना नोकरी सोडून एका अपार्टमेंटमध्ये सुपरवायझर म्हणून काम करावे लागले. हितेशची आई हंसाबेन यांनी शिवणकाम करून कुटुंबाला आर्थिक आधार दिला. आईने एका मुलाखतीत सांगितले की, 'आम्ही तीन चादरींसह एका छोट्या झोपडीत राहत होतो, तिथे माझ्या मुलाने ही परिस्थिती पाहिली आणि मन लावून अभ्यास केला' हितेश जेव्हा अभ्यासाला बसायचा, तेव्हा त्याची आई रात्रभर त्याच्यासोबत बसून त्याला मदत करत असे. आईचा हा त्याग आणि सहकार्य हितेशच्या यशात मोठे योगदान देणारं आहे.
एका सामान्य कुटुंबातील या तरुणाने चार्टर्ड अकाउंटंट परीक्षेत उत्कृष्ट यश मिळवून नवसारी जिल्ह्याचा आणि आपल्या आई-वडिलांचा गौरव वाढवला आहे. हितेश राजपूतने पहिल्याच प्रयत्नात सीए अंतिम परीक्षा उत्तीर्ण करून नवसारी जिल्ह्यात पहिली रँक मिळवली आहे. त्याचा हा प्रवास खूपच साधा पण प्रेरणादायक होता. त्याने अगदी लहानपणापासूनच शिक्षण क्षेत्रात उच्च स्थान मिळवण्याचे स्वप्न पाहिले होते. सीए परीक्षेत अव्वल स्थान मिळवण्यासाठी त्याने सोशल मीडियाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आणि सातत्याने केवळ अभ्यासावर लक्ष केंद्रित केले.
हितेशच्या या अभूतपूर्व यशामुळे त्याच्या आई-वडिलांच्या डोळ्यांमध्ये आज आनंदाश्रू आहेत. उत्तमसिंह राजपूत यांच्या हिऱ्यांच्या मंदीमुळे व्यवसाय सोडणाऱ्या मुलाने आज नवसारी जिल्ह्यामध्ये अव्वल स्थान मिळवून कुटुंबात आनंदाची लहर आणली आहे. हितेशने नवसारी जिल्ह्याचा गौरव तर वाढवलाच, पण त्याचबरोबर त्याने इतर गरजू विद्यार्थ्यांसाठी एक उत्कृष्ट प्रेरणास्रोत उभा केला आहे. त्याने दाखवून दिले की, दृढ निश्चय आणि समर्पण असेल तर कोणतेही स्वप्न गाठणे शक्य आहे.
