गावरान कोंबड्यांची वाढती बाजारपेठ
बाजारात गावरान कोंबड्यांना (लोकल चिकन) नेहमीच मागणी असते. विशेषतः जंगली कोंबड्यांचे मांस चवीच्या आणि आरोग्याच्या दृष्टीने लोकांमध्ये खूप लोकप्रिय आहे. सणासुदीच्या काळात तर त्यांची मागणी आणखी वाढते. जर तुम्हीही एखाद्या व्यवसायात गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, तर ही माहिती तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकते.
सैदम्माची यशोगाथा
तेलंगणातील सूर्यपेट जिल्ह्यातील मद्दीराला मंडलातील कुक्कडम गावाच्या रहिवासी असलेल्या सैदम्मा नाटू यांनी पोल्ट्री व्यवसायात पाऊल ठेवले. कोविडनंतर, त्यांनी पतीच्या मदतीने कोंबड्या पाळायला सुरुवात केली. सुरुवातीला काही अडचणी आल्या, पण कठोर परिश्रम आणि योग्य दिशेने केलेल्या प्रयत्नांमुळे त्यांना यश मिळालं.
advertisement
व्यवसायाची सुरुवात आणि वाढ
सैदम्मा यांनी आपल्या शेतात बांधलेल्या एका छोट्याशा शेडमधून पोल्ट्री व्यवसायाची सुरुवात केली. सुरुवातीला त्यांनी 2 हजार पिल्ले विकत घेऊन त्यांना वाढवले. चार महिन्यांनंतर, या कोंबड्या 1 ते 2 किलो वजनाच्या होतात आणि त्यानंतर त्यांची विक्री केली जाते. दर चार महिन्यांनी कोंबड्यांचा एक बॅच तयार होतो. त्या हे काम अतिशय नियोजनबद्ध (सिस्टमॅटिक) पद्धतीने करतात, ज्यामुळे त्यांना चांगला नफा मिळतो.
खर्च आणि नफ्याचे गणित
आता खर्चाबद्दल बोलायचं झाल्यास, प्रत्येक बॅचमध्ये कोंबड्यांच्या खाद्यावर, औषधांवर आणि इतर आवश्यक गोष्टींवर सुमारे 15 लाख रुपये खर्च होतो. मात्र, एका बॅचमधून सैदम्मा यांना 4.50 लाख रुपये मिळतात. सर्व खर्च विचारात घेतल्यास त्यांना सुमारे 1.50 लाख रुपयांचा नफा होतो. वर्षातून तीन बॅच तयार झाल्यास, सैदम्मा यांचा एकूण नफा १10 लाख रुपयांपेक्षा जास्त होतो.
व्यवसाय सुरू करण्यापूर्वी हे जाणून घ्या
जर तुम्हीही कोणताही व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल, तर सर्वात आधी त्या क्षेत्रात मागणी आहे की नाही, हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. जेव्हा तुम्ही योग्य नियोजन करून कठोर परिश्रम करता, तेव्हा यश निश्चित मिळते. सैदम्माप्रमाणे, तुम्हीही चांगला व्यवसाय निवडून तुमचं उत्पन्न वाढवू शकता.
हे ही वाचा : उन्हाळ्यात आंबे खाताय? तर 'या' गोष्टींची घ्या काळजी, अन्यथा होऊ शकतं मोठं नुकसान!
हे ही वाचा : Poultry Farming : वर्षाला 12 लाख कमावतात, पण कोंबड्यांना चारा कुठला देतात? पाहा तुमच्या फायद्याची बातमी!