उन्हाळ्यात आंबे खाताय? तर 'या' गोष्टींची घ्या काळजी, अन्यथा होऊ शकतं मोठं नुकसान!

Last Updated:

उन्हाळा म्हणजे आंब्याचा सण! मात्र आंबा खाण्याची योग्य पद्धत जाणून घेणे गरजेचे आहे. आंब्याचे स्वरूप उष्ण असल्याने तो खाण्यापूर्वी 3-4 तास पाण्यात भिजवावा आणि...

Mango health effects
Mango health effects
उन्हाळा सुरू झाला की, बाजारात वेगवेगळ्या प्रकारचे आंबे दिसायला लागतात. गोड आणि रसाळ आंबे पाहून कोणालाही मोह आवरता येत नाही. लहान असो वा मोठे, आंबे खायला सगळ्यांनाच खूप आवडतात. पण तुम्हाला माहितेय का, जास्त आंबे खाल्ल्याने तुमच्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो? त्यामुळे आंबे खाताना काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे.
पहिली गोष्ट म्हणजे आंब्याचा गुणधर्म उष्ण असतो. जर तुम्ही आंबा थेट बाजारातून आणून किंवा झाडावरून काढून लगेच खाल्ला तर त्यामुळे शरीरातील उष्णता वाढू शकते. डायटिशियनच्या मते, आंबा खाण्यापूर्वी कमीतकमी तीन ते चार तास पाण्यात भिजवून ठेवावा. यामुळे त्याची उष्णता बऱ्याच प्रमाणात कमी होते आणि आंबा शरीराला अपाय करत नाही.
आंबे खाताना घ्या विशेष काळजी
आंब्यामध्ये नैसर्गिकरित्या साखरेचे प्रमाण भरपूर असते. तुम्ही एकाच वेळी खूप जास्त आंबे खाल्ले तर रक्तातील साखर वाढू शकते. मधुमेहाच्या रुग्णांसाठी हे विशेषतः धोकादायक असू शकते. त्यामुळे त्यांनी आंबे खाताना विशेष काळजी घ्यावी आणि मर्यादित प्रमाणातच आंब्याचे सेवन करावे.
advertisement
एवढंच नाही तर जास्त आंबे खाल्ल्याने पचनक्रियेवरही परिणाम होऊ शकतो. डायटिशियन मंजू मथळकर यांच्या मते, जास्त आंबे खाल्ल्यास लूज मोशन किंवा जुलाब होऊ शकतात. त्यामुळे आंबा संतुलित प्रमाणात खाणेच फायदेशीर ठरते.
पोटही खराब होऊ शकतं
जर तुम्ही आंब्याचा रस पिण्याऐवजी थेट आंबा खाल्ला, तर त्यातील फायबरचाही तुम्हाला फायदा मिळतो. फायबरमुळे शरीराची पचनक्रिया मजबूत होते आणि बद्धकोष्ठतेसारख्या समस्या टाळता येतात, पण जर फायबरचं प्रमाण जास्त झालं तर पोट खराब होण्याची शक्यताही असते. त्यामुळे लक्षात ठेवा की चवीच्या नावाखाली आरोग्याशी तडजोड करू नका.
advertisement
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
उन्हाळ्यात आंबे खाताय? तर 'या' गोष्टींची घ्या काळजी, अन्यथा होऊ शकतं मोठं नुकसान!
Next Article
advertisement
Vinod Ghosalkar On Tejasvee Ghosalkar: तेजस्वींचा भाजपात प्रवेश, १२ तास आधी घरात काय घडलं? सासरे घोसाळकरांनी सगळंच सांगितलं...
तेजस्वींचा भाजपात प्रवेश, १२ तास आधी घरात काय घडलं? सासरे घोसाळकरांनी सगळंच सांग
  • तेजस्वींचा भाजपात प्रवेश, १२ तास आधी घरात काय घडलं? सासरे घोसाळकरांनी सगळंच सांग

  • तेजस्वींचा भाजपात प्रवेश, १२ तास आधी घरात काय घडलं? सासरे घोसाळकरांनी सगळंच सांग

  • तेजस्वींचा भाजपात प्रवेश, १२ तास आधी घरात काय घडलं? सासरे घोसाळकरांनी सगळंच सांग

View All
advertisement