Akshaya Tritiya 2025: अक्षय तृतीयेला तब्बल 4 दशकानंतर मोठा योग, या गोष्टी घेण्याचं टाळा!
- Published by:Mohan Najan
- Reported by:Apurva Pradip Talnikar
Last Updated:
हिंदू धर्मामध्ये अक्षय तृतीयाला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. या दिवशी आपण अनेक अशा नवीन वस्तू खरेदी करतो किंवा दानधर्म देखील करतो.
हिंदू धर्मामध्ये अक्षय तृतीयाला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त या दिवशी असतो. या दिवशी आपण अनेक अशा नवीन वस्तू खरेदी करतो किंवा दानधर्म देखील करतो. तर या दिवशीचं काय महत्त्व आहे? या दिवशी तुम्ही काय दानधर्म करावं? याविषयीचं गुरुजी सुरेश केदारे यांनी माहिती दिली आहे.
advertisement
advertisement
advertisement
हा जो योग आलेला आहे या दिवशी जर तुम्ही दानधर्म केले तर तुम्हाला सहस्त्रपट पुण्य मिळतं. या दिवशी तुम्ही जर काही खरेदी करणार असाल तर तुम्ही सर्व गोष्टी खरेदी करू शकता जसे की सोने खरेदी करणे, घर खरेदी करणे, भूमिपूजन करणे, नवीन वस्तू घेणे किंवा वाहन खरेदी करणे देखील तुम्ही करू शकता. या दिवशी स्टील किंवा ॲल्युमिनियम वस्तू खरेदी करणे अशुभ मानले जाते. त्यामुळे या वस्तूंची खरेदी करून नये.
advertisement
advertisement
advertisement