iPhone 17 सिरीजच्या iPhone 17, iPhone 17 Pro, iPhone 17 Pro Max आणि iPhone Airच्या सर्व मॉडेल्ससाठी प्री-ऑर्डर 12 सप्टेंबरपासून सुरू होतील आणि ते 19 सप्टेंबरपासून भारतातील स्टोअर्स आणि ऑनलाइन प्लॅटफॉर्मवरून खरेदी करता येतील.
यावेळी अॅपलने सर्व मॉडेल्सच्या किंमतीत किंचित वाढ केली आहे. iPhone 17 ची सुरुवातीची किंमत ₹82,900 आहे. तर iPhone 17 Pro ची सुरुवातीची किंमत ₹1,34,900 आहे आणि iPhone 17 Pro Max ची सुरुवातीची किंमत ₹1,49,900 आहे. तरं, हे डिव्हाइस भारताच्या तुलनेत अमेरिकेत खूपच स्वस्त उपलब्ध आहेत. चला भारतीय किंमती आणि अमेरिका, दुबई, यूके, व्हिएतनाममधील फरक पाहूया.
advertisement
WhatsApp Trick: नेट ऑन असुनही येणार नाही मेसेज! दिसेल फक्त सिंगल टिक
iPhone 17 ची किंमत
भारत: ₹82,900
अमेरिका: ₹70,500
UAE / दुबई: ₹81,700
UK: ₹87,900
व्हिएतनाम: ₹128,800
iPhone Air
भारत: ₹119,900
अमेरिका: ₹88,200
UAE / दुबई: ₹103,300
UK: ₹109,900
वियतनाम: ₹105,400
iPhone 17 भारतात लॉन्च! ॲपलच्या नव्या सीरिजची किंमत, फीचर्स आणि A टू Z माहिती
iPhone 17 Pro
भारत: ₹134,900
अमेरिका: ₹97,000
UAE / दुबई: ₹113,000
UK: ₹120,900
व्हिएतनाम: ₹115,500
iPhone 17 Pro Max
भारत: ₹149,900
यूएस: ₹105,800
UAE / दुबई: ₹122,500
UK: ₹131,900
व्हिएतनाम: ₹125,400.
आपण सर्व मॉडेल्सच्या किमती पाहिल्या तर, यासाठी अमेरिका सर्वात स्वस्त देश आहे. त्यानंतर UAE / दुबई दुसऱ्या क्रमांकावर येते, तर भारतातील किंमत जवळजवळ सर्व मॉडेल्समध्ये अमेरिकेपेक्षा ₹10,000 ते ₹44,000 जास्त आहे.
एखादी व्यक्ती परदेशात प्रवास करत असेल किंवा कर सवलती मिळवू शकत असेल. तर अमेरिकेतून खरेदी करणे हा सर्वोत्तम ऑप्शन आहे. खरंतर, युएई देखील एक चांगला ऑप्शन असू शकतो, तो भारतापासून फार दूर नाही.