TRENDING:

1 महिना फ्रीमध्ये हाय-स्पीड इंटरनेट हवंय? ही कंपनी देतेय संधी

Last Updated:

तुम्ही खूप इंटरनेट वापरत असाल, तर Excitel तुमच्यासाठी Super Deal ऑफर घेऊन येत आहे. 3 महिन्यांच्या प्लॅनसह एक महिना फ्री इंटरनेट आणि 15 OTT अ‍ॅप्सचा वापर करा. प्लॅन आणि किंमतींबद्दल जाणून घ्या.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर Excitelने त्यांच्या ब्रॉडबँड यूझर्ससाठी एक उत्तम ऑफर लाँच केली आहे. ज्यामध्ये एक महिना फ्री इंटरनेट डेटा मिळतो. ही ऑफर कंपनीच्या सुपर डील योजनेचा एक भाग आहे. जी मर्यादित काळासाठी उपलब्ध आहे. ही ऑफर यूझर्सना त्यांच्या नियमित 3 महिन्यांच्या प्लॅनवर अतिरिक्त महिन्याची व्हॅलिडिटी देते. म्हणजेच ते आता चार महिन्यांसाठी इंटरनेट अ‍ॅक्सेसचा आनंद घेऊ शकतात.
टेक न्यूज
टेक न्यूज
advertisement

Excitelची ही Super Deal ऑफर 3 महिन्यांच्या तिमाही प्लॅनवर लागू आहे. हा प्लॅन ग्राहकांना 200Mbps पर्यंत हाय-स्पीड इंटरनेट सर्व्हिस देते. या प्लॅनची किंमत दरमहा फक्त ₹530 आहे (जीएसटी वेगळा आहे).

या योजनेसह, यूझर्सना डिस्ट्रो टीव्ही, फॅनकोड, हंगामा प्ले, शेमारू आणि शॉर्ट्स टीव्हीसह 15 ओटीटी अ‍ॅप्सचा फ्री अ‍ॅक्सेस देखील दिला जातो. याचा अर्थ असा की त्यांना इंटरनेटसह मनोरंजनाचे संपूर्ण पॅकेज मिळते.

advertisement

रील्सचं वेड असणाऱ्यांसाठी गुड न्यूज! Instagram ने लॉन्च केलंय जबरदस्त फीचर

इतर Excitel ब्रॉडबँड प्लॅन

Excitel त्यांच्या ग्राहकांसाठी वेगवेगळ्या स्पीडसह अनेक आकर्षक प्लॅन देखील ऑफर करते.

100Mbps प्लॅन: दरमहा 667 रुपये (3 महिन्यांच्या पॅकसह)

300Mbps प्लॅन: दरमहा 499 रुपये (12 महिन्यांच्या पॅकसह)

त्याच स्पीडसह 3 महिन्यांचा पॅक दरमहा 816 रुपये (अधिक GST) मध्ये उपलब्ध आहे.

advertisement

कंपनी 3 महिने, 6 महिने आणि 12 महिन्यांच्या व्हॅलिडिटीसह प्लॅन ऑफर करते. सर्व प्लॅनमध्ये Fair Usage Policy (FUP) अंतर्गत 3300GB पर्यंत डेटा वापर लिमिट आहे.

सायबर फ्रॉडवर लागणार लगाम? सरकार आणतेय नवा नियम, पाहा काय बदलेल

बीएसएनएलच्या ऑफरबद्दल जाणून घ्या

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सोयाबीन दर दबावातच, कांदा आणि मक्याची काय स्थिती? चेक करा एका क्लिकवर
सर्व पहा

दरम्यान, बीएसएनएलने 18 ऑक्टोबर ते 18 नोव्हेंबर पर्यंत लिमिटेड काळासाठी ऑफर देखील जाहीर केली आहे. या ऑफर अंतर्गत, स्वस्त वार्षिक प्लॅनसह रिचार्ज करणाऱ्या यूझर्सना सहा महिन्यांचे फ्री BiTV Premium सबस्क्रिप्शन मिळेल. ज्यामध्ये 500 हून अधिक लाइव्ह चॅनेल आणि अनेक प्रमुख OTT अ‍ॅप्स समाविष्ट आहे.

advertisement

मराठी बातम्या/टेक्नोलॉजी/
1 महिना फ्रीमध्ये हाय-स्पीड इंटरनेट हवंय? ही कंपनी देतेय संधी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल