नवीन AI फीचर्स : Apple च्या या अपडेटमध्ये अनेक भन्नाट फीचर्स आहेत. यात Visual Intelligence, AI-आधारित Image Playground आणि Zenmoji सारखे नवे फीचर्स उपलब्ध आहेत. या फीचर्समुळे तुमचा iPhone अनुभव अधिक मजेदार आणि आधुनिक होईल.
YouTubers साठी Layered Recording : Content Creator, म्युझिशियन किंवा पॉडकास्ट होस्ट असलेल्या लोकांसाठी Layered Recording हे वैशिष्ट्य खूप उपयुक्त ठरणार आहे. या फीचरद्वारे Voice Memo एप वापरून तुम्ही अनेक आवाज एकत्र रेकॉर्ड करू शकता. म्युझिक प्ले करतानाच त्यावर आवाज रेकॉर्ड करण्याचा पर्याय उपलब्ध आहे. यामुळे तुम्ही voice-over देखील म्युझिकसोबत सहज मिक्स करू शकता.
advertisement
Image Playground : Apple च्या नवीन AI-आधारित Image Playground फीचरने तुमच्या कल्पना प्रत्यक्षात आणता येतील. तुम्ही दिलेल्या टेक्स्टनुसार हे फीचर सुंदर इमेज तयार करू शकते. यामध्ये एनिमेशन आणि इलस्ट्रेशन दोन्ही प्रकारचे फोटो तयार करता येतात.
Zenmoji : Apple ने पहिल्यांदाच तुमच्या भावनांवर आधारित emoji तयार करण्याचे फीचर दिले आहे. Zenmoji नावाच्या फीचरद्वारे तुम्ही टेक्स्टच्या मदतीने तुमच्यासाठी खास emoji तयार करू शकता.
हे ही वाचा : Really आणि Actually मध्ये फरक काय? कोणता शब्द कधी वापरायचा?
हे ही वाचा : Numerology, 17 December 2024: मंगळ घालवणार अमंगळ! या जन्मतारखांना आर्थिक लाभाचे योग, डबल सरप्राईज