जास्त पॉवरचा चार्जर वापरणं सुरक्षित आहे का?
जर तुमचा फोन 18W चार्जिंग सपोर्ट करत असेल आणि तुम्ही त्याला 80W किंवा 100W चार्जरने चार्ज करत असाल, तर काळजी करण्यास काहीच कारण नाही. हे पूर्णपणे सुरक्षित आहे. कारण आजकालच्या स्मार्टफोन आणि चार्जरमध्ये Power Negotiation Protocol नावाची एक टेक्नॉलॉजी असते, जी फोनच्या क्षमतेनुसार चार्जिंग नियंत्रित करते.
advertisement
यामुळे फोन जास्त पॉवर घेणार नाही, तर त्याला जितकी गरज आहे तितकीच ऊर्जा मिळेल. उदाहरणार्थ, 18W चार्जिंग क्षमतेचा फोन जर 100W चार्जरने लावला, तरी त्याला केवळ 18W इतकीच पॉवर मिळेल.
ही टेक्नॉलॉजी नेमकी काम कशी करते?
Power Negotiation Protocol चार्जरला फोनची क्षमता सांगतो म्हणजेच फोनला किती वॅट पॉवर लागेल आणि किती पुरवायची आहे. त्यानुसार चार्जर तेवढीच पॉवर फोनकडे पाठवतो. त्यामुळे जास्त वॅटचा चार्जर वापरल्याने फोन ओव्हरलोड होत नाही, आणि बॅटरी सुरक्षित राहते.
बॅटरी मॅनेजमेंट सिस्टीमचीही भूमिका
आजच्या स्मार्टफोन्समध्ये Battery Management System (BMS) देखील असतो. हा सिस्टीम चार्जिंग दरम्यान तापमान, व्होल्टेज आणि करंट नियंत्रित करतो. फोन गरम झाल्यास तो आपोआप चार्जिंग थांबवतो, ज्यामुळे बॅटरीचे आयुष्य वाढते आणि नुकसान होण्याची शक्यता कमी होते.
थोडक्यात सांगायचं झालं तर, जास्त वॅटचा चार्जर वापरणं धोकादायक नाही, कारण तुमचा स्मार्टफोन स्वतःच ठरवतो की त्याला किती पॉवर घ्यायची आहे.
