TRENDING:

Offline Google Map : गुगल मॅप ऑफलाईन कसा वापरायचा? इंटरनेट किंवा नेटवर्क नसताना 'ही' ट्रिक करेल मदत

Last Updated:

how to use offline google map : जेव्हा इंटरनेट उपलब्ध नसतं जसं की डोंगराळ भागात ड्राइव्ह करताना, जंगल किंवा दुर्गम भागात ट्रेकिंग करताना, किंवा एखाद्या गावात जिथे नेटवर्क वारंवार गायब होतं. अशा वेळी Google Maps चं ‘Offline Feature’ म्हणजे अक्षरशः वरदान ठरतं. इंटरनेटशिवायसुद्धा योग्य रस्ता दाखवण्याची क्षमता असलेलं हे फीचर खूप लोकांच्या कामी येतं.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : आजच्या डिजिटल जगात Google Maps हा प्रवास करणाऱ्या प्रत्येकासाठी एक ‘नेव्हिगेशन पार्टनर’ बनला आहे. मग तो ऑफिसला जाणारा व्यक्ती असो किंवा दूरच्या शहरात ट्रीपला निघालेला ट्रॅव्हलर, सगळ्यांच्या मोबाईलमध्ये Google Maps असणं आता गरजेचं झालं आहे. पण काही वेळा अशी परिस्थिती येते, जेव्हा इंटरनेट उपलब्ध नसतं जसं की डोंगराळ भागात ड्राइव्ह करताना, जंगल किंवा दुर्गम भागात ट्रेकिंग करताना, किंवा एखाद्या गावात जिथे नेटवर्क वारंवार गायब होतं.
प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो
advertisement

अशा वेळी Google Maps चं ‘Offline Feature’ म्हणजे अक्षरशः वरदान ठरतं. इंटरनेटशिवायसुद्धा योग्य रस्ता दाखवण्याची क्षमता असलेलं हे फीचर खूप लोकांच्या कामी येतं. चला तर मग जाणून घेऊया Google Maps ऑफलाइन कसं वापरायचं आणि त्याचे काही भन्नाट फीचर्स कोणते आहेत.

Google Maps चे स्मार्ट फीचर्स

Google Maps आता फक्त रस्ता दाखवण्यासाठीच नाही, तर ट्रॅव्हल अनुभव अधिक स्मार्ट बनवण्यासाठी अनेक आधुनिक फीचर्ससह अपडेट झालं आहे.

advertisement

Photo-First Search Result:

एखादं ठिकाण गाठण्याआधीच तुम्ही त्या ठिकाणच्या फोटो पाहू शकता, जे जगभरातील युजर्सनी अपलोड केलेले असतात.

Live View फीचर:

हे फीचर तुमच्या मोबाईलच्या कॅमेरामार्फत रिअल-टाईममध्ये दिशानिर्देश दाखवतं. स्क्रीनवर बाण आणि सूचनांद्वारे तुम्हाला कुठे वळायचं हे दिसतं.

AI आधारित ऑब्जेक्ट ओळख:

तुमच्या कॅमेरातून आसपासच्या वस्तू, ठिकाणं, दुकानं इत्यादींची माहिती मिळते, ज्यामुळे अनोळखी भाग समजून घेणं सोपं होतं.

advertisement

आता तुम्ही अगदी नैसर्गिक भाषेत प्रश्न विचारू शकता जसं “माझ्याजवळचं बेस्ट रेस्टॉरंट कोणतं?” आणि Google तुम्हाला वैयक्तिक सल्ला देईल.

Google Maps द्वारे आता तुम्ही फ्लाइटचे वेळापत्रक, तिकिटांचे दर आणि ट्रॅव्हल प्लॅनची तुलना सहज करू शकता.

फिरायला गेल्यावर कधीकधी असं होतं की एखाद्या ठिकाणी इंटरनेट नसतं किंवा नेटवर्क काम करत नाही. अशावेळी गुगल मॅप वापरणं अशक्य होत. पण तुम्हाला माहितीय का की तुम्ही इंटरनेटशिवाय मॅप वापरु शकता?

advertisement

इंटरनेटशिवाय Google Maps कसं वापरायचं?

जर तुम्ही अशा ठिकाणी जाणार असाल जिथे नेटवर्क week असतं, तर ऑफलाइन मॅप डाउनलोड करून ठेवा. हे करण्याची पद्धत अशी:

1. Google Maps अ‍ॅप उघडा (Android किंवा iPhone वर).

2. इंटरनेट कनेक्शन चालू ठेवा आणि ‘Incognito Mode’ बंद ठेवा.

3. वरच्या उजव्या कोपऱ्यातील प्रोफाइल फोटोवर टॅप करा.

advertisement

4. मेनूमध्ये ‘Offline Maps’ पर्याय निवडा आणि ‘Select Your Own Map’ वर क्लिक करा.

5. स्क्रीनवर दिसणाऱ्या निळ्या बॉक्समधून तुम्हाला हवं असलेलं क्षेत्र निवडा.

6. खालील Download बटणावर क्लिक करा.

बस्स! आता तुमचा मॅप Offline Maps सेक्शनमध्ये सेव झाला आहे, जो तुम्ही कुठल्याही इंटरनेटशिवाय वापरू शकता.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
अतिवृष्टीचा फटका, बबन यांच्या सीताफळाचे मोठं नुकसान, खर्च निघणे झालं अवघड
सर्व पहा

या फीचरमुळे Google Maps आता फक्त एक अ‍ॅप नाही, तर प्रत्येक प्रवाशाचा विश्वासार्ह साथीदार बनला आहे. जो इंटरनेट नसतानाही तुम्हाला योग्य मार्ग दाखवू शकतो.

मराठी बातम्या/टेक्नोलॉजी/
Offline Google Map : गुगल मॅप ऑफलाईन कसा वापरायचा? इंटरनेट किंवा नेटवर्क नसताना 'ही' ट्रिक करेल मदत
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल