पण आता एक Made in India ऍप झपाट्याने लोकप्रिय होतंय ते म्हणजे Mappls.
अलीकडेच केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सोशल मीडियावर Map My India चं हे स्वदेशी ऍप वापरताना व्हिडिओ शेअर केला, आणि त्यानंतर लोकांमध्ये या ऍपची जोरदार चर्चा सुरू झाली. आता असा प्रश्न उभा राहिला आहे की Mappls खरंच Google Maps ला टक्कर देऊ शकतो का?
advertisement
कोणतंही ऍप उघडलं की आपल्याला पहिल्यांदा जाणवतं ते किती स्मूथ चालत आहे किंवा वापरताना कुठेही अडखळत नाही किंवा काही त्रुटी येत आहेत. Google Maps या बाबतीत अजूनही एकदम पुढे आहे. झूम करताना, स्क्रोल करताना सगळं अगदी चांगलं काम करतं, पण तेच Mappls वापरताना मात्र लोकेशन शोधताना किंवा स्क्रीन हलवताना थोडं लॅग जाणवतं. त्यामुळे अनुभवाच्या बाबतीत अजून थोडी सुधारणा लागेल असं वाटतं.
3D जंक्शन व्यू
पण या सगळ्यात गुगल मॅप वापरताना एक तक्रार आजही लोक करतात की कधी रस्त्यावरुन जायचं किंवा कधी पुल किंवा फ्लायओवर पकडायचा हे कळत नाही. ज्यामुळे चालकाचा नेहमीच गोंधळ होतो. पण Mappls मध्ये जंक्शन किंवा फ्लायओव्हर येण्याआधीच 3D व्यू दिसतो, ज्यामुळे पुढचा रस्ता आणि लेन नीट समजते. हा फिचर भारतासारख्या देशात जिथे असंख्य आणि गुंतागुंतीचे रस्ते आहेत तिथे खरंच उपयुक्त आहे.
ट्रॅफिक आणि अलर्ट्स
Google Maps वर अपघात, ट्रॅफिक जाम किंवा पाणी साचलेली ठिकाणं दिसतातच, पण Mappls इथेही एक पाऊल पुढे आहे. हे अॅप खड्डे, स्पीड ब्रेकर, ब्लॅक स्पॉट्स, ट्रॅफिक सिग्नल्स आणि ओव्हरस्पीड अलर्ट्स सुद्धा दाखवतं.
म्हणजे प्रवास अधिक सुरक्षित होतो.
इनडोअर नेव्हिगेशन
Google Maps फक्त काही निवडक जागांसाठीच इनडोअर मॅप दाखवतं, पण Mappls मध्ये मोठे मॉल्स, एअरपोर्ट्स आणि कन्वेन्शन सेंटर्स मध्येही दिशा दाखवता येते. हा फिचर भारतात पहिल्यांदाच इतक्या तपशीलात दिला गेलाय.
इलेक्ट्रिक वाहनांसाठी खास सुविधा
दोन्ही अॅप्सवर चार्जिंग स्टेशन आणि पेट्रोल पंप ची माहिती मिळते. पण Mappls मध्ये एक वेगळा फिचर आहे. तुमच्या ईव्ही (इलेक्ट्रिक वाहन) मध्ये उरलेल्या बॅटरीवर तुम्ही किती अंतर जाऊ शकता, हे ते दाखवतं. हा फिचर सध्या Google Maps वर नाही.
Mappls खरंच Google Maps चा पर्याय ठरू शकेल का?
एकूणच पाहता, Mappls भारतीय वापरकर्त्यांसाठी बनलेलं एक उत्तम आणि स्थानिक परिस्थितीला साजेसं अॅप आहे.
त्यात 3D जंक्शन व्यू, ब्लॅक स्पॉट अलर्ट आणि ईव्ही रूटिंगसारखे भारतीय रस्त्यांसाठी योग्य फिचर्स आहेत.
तरीही, यूजर इंटरफेस आणि स्मूथनेस मध्ये Google Maps अजूनही आघाडीवर आहे.
जर Mappls ने हे छोटे तांत्रिक दोष सुधारले, तर लवकरच ते Google Maps ला जबरदस्त स्पर्धा देईल आणि खरंच भारताचं स्वतःचं नेव्हिगेशन अॅप बनू शकेल.