किंमत आणि सेलमधील ऑफर
फ्लिपकार्टने स्पष्ट केले आहे की, Pixel 9 ची किंमत 37,999 रुपये निश्चित करण्यात आली आहे. याशिवाय, ICICI बँकेच्या कार्डवर 2,000 रुपयांची अतिरिक्त सूट आणि जुना फोन एक्सचेंजवर 1,000 रुपयांची सूट मिळू शकते. अशा प्रकारे फोनची प्रभावी किंमत फक्त 34,999 रुपये राहते. इच्छुक ग्राहक फ्लिपकार्टवरील Notify Me ऑप्शन वापरून डील अपडेट्स मिळवू शकतात.
advertisement
Pixel 9 ची फीचर्स
Pixel 9 हा चार आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध आहे. Peony, Porcelain, Obsidian आणि Wintergreen. यात 6.3-इंचाचा डिस्प्ले, 10.5MP फ्रंट कॅमेरा आणि 4,700mAh बॅटरी आहे. फोनमध्ये गुगलचा Tensor G4 प्रोसेसर आणि Titan M2 सिक्युरिटी को-प्रोसेसर आहे. मागील बाजूस 50MP वाइड-अँगल लेन्स आणि एक अतिरिक्त कॅमेरा आहे जो उत्तम फोटोग्राफीचा अनुभव देतो.
Ghibli नंतर 'या' नव्या फोटो ट्रेंडने लोकांना लावलं वेड! या सोप्या ट्रिकने तुम्हीही करु शकता तयार
Flipkart BBD सेल डेट
बिग बिलियन डेज सेल 2025 फ्लिपकार्ट प्लस आणि ब्लॅक सदस्यांसाठी 22 सप्टेंबरपासून सुरू होईल. तर उर्वरित यूझर्स 23 सप्टेंबरपासून त्याचा लाभ घेऊ शकतात. गुगल व्यतिरिक्त, अॅपल, सॅमसंग आणि मोटोरोला सारखे ब्रँड देखील या सेलमध्ये सहभागी होत आहेत.
सिम कार्डचा एक कोपरा कट झालेला का असतो? 99 टक्के लोकांना माहितीच नसेल उत्तर
अतिरिक्त ऑफर आणि डिस्काउंट
सेलमध्ये बँक कार्डद्वारे अतिरिक्त डिस्काउंट मिळू शकतात. अॅक्सिस बँक आणि आयसीआयसीआय बँक क्रेडिट कार्ड धारकांसाठी देखील विशेष ऑफर उपलब्ध असतील. याशिवाय, UPI डिस्काउंट, नो-कॉस्ट EMI, एक्सचेंज स्कीम आणि सुपर कॉइन्स सारख्या सुविधा देखील ग्राहकांना आकर्षित करतील.