SIM कधी डिअॅक्टिव्हेट केली जाते?
तुम्ही सलग 90 दिवस तुमचे सिम वापरले नाही म्हणजेच कोणताही कॉल, एसएमएस किंवा डेटा वापरला नाही, तर तुमचा नंबर डिअॅक्टिव्हेट केला जातो. हा नियम सर्व प्रमुख कंपन्यांना लागू होतो - जसे की Jio, Airtel आणि Vi.
बॅलन्ससह व्हॅलिडिटी कशी वाढते?
90 दिवसांनंतर तुमच्या खात्यात 20 रुपयांपेक्षा जास्त बॅलेन्स राहिले, तर टेलिकॉम कंपन्या आपोआप 20 रुपये कापून घेतात आणि तुमचा वापर न करण्याचा कालावधी आणखी 30 दिवसांनी वाढवतात. तुमच्या अकाउंटमधील बॅलेन्स 20 रुपयांपेक्षा कमी होईपर्यंत ही प्रोसेस सुरू राहते. बॅलेन्स संपल्यानंतर तुमचा नंबर डिअॅक्टिव्हेट केला जाईल.
advertisement
Amazon Great India फेस्टिव्हलसह फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज सेल डेटची घोषणा! मिळतील भारी डील्स
डिअॅक्टिव्हेट केलेला नंबर कसा अॅक्टिव्हेट करायचा?
तुमचे सिम डिअॅक्टिव्हेट केले असेल, तर तुम्हाला ते पुन्हा अॅक्टिव्ह करण्यासाठी 15 दिवस मिळतात. या कालावधीत, 20 रुपये शुल्क भरून नंबर पुन्हा अॅक्टिव्ह केला जाऊ शकतो. तुम्ही असे केले नाही, तर तुमचा नंबर कायमचा बंद होईल आणि पुन्हा वापरता येणार नाही.
iPhone 17 सीरीजच्या किंमतींवरही होणार GST 2.0 चा परिणाम? घ्या जाणून
म्हणजेच, जिओ, एअरटेल आणि व्हीआय यूझर्स रिचार्ज न करताही सुमारे 90 दिवसांपर्यंत इनकमिंग कॉल आणि मेसेजचा लाभ घेऊ शकतात. परंतु या काळात कोणतेही आउटगोइंग कॉल, डेटा किंवा एसएमएस वापरता येणार नाहीत. जर तुम्हाला तुमचे सेकंडरी सिम जास्त काळ अॅक्टिव्ह ठेवायचे असेल तर वेळोवेळी ते वापरणे किंवा किमान बॅलेन्स राखणे आवश्यक आहे.