ही समस्या टाळण्यासाठी, व्हॉट्सअॅपमध्ये Silence Unknown Callers नावाचे एक फीचर आहे. ते तुम्हाला अनोळखी नंबरवरून येणारे कॉल म्यूट करण्याची परवानगी देते, ज्यामुळे तुमची प्रायव्हसी सुरक्षित राहते.
अज्ञात कॉल सायलेंट करण्याचे फायदे
- हे वारंवार येणाऱ्या स्पॅम किंवा स्कॅम कॉल्सपासून आराम देते.
- अज्ञात नंबरवरून येणारे कॉल पूर्णपणे गायब होत नाहीत, परंतु ते व्हॉट्सअॅपच्या कॉल हिस्ट्रीमध्ये सेव्ह केले जातात.
- गरज पडल्यास तुम्ही नंतर स्वतः त्या नंबरवर कॉल करू शकता.
- तुमच्या ओळखीचे लोकच तुम्हाला थेट कॉल करू शकतील, ज्यामुळे तुमची प्रायव्हसी आणखी मजबूत होईल.
advertisement
गुपचूप वीज बिल वाढवतेय तुमची TV! 'या' 5 सेटिंग बदलताच होईल अर्ध
Android फोनमध्ये Silence Unknown Callers कसे चालू करावेत?
- सर्वात आधी फोनमध्ये WhatsApp ओपन करा.
- वरती उजवीकडे असलेल्या तीन डॉट्सवर टॅप करा.
- Settings वर जा.
- नंतर Privacy ऑप्शन उघडा.
- कॉल्स सेक्शनमध्ये खाली स्क्रोल करा.
- Silence Unknown Callers ऑन करा.
हे फीचर ऑन केल्यानंतर अनोळखी नंबरवरुन येणाऱ्या कॉलचं नोटिफिकेशन आणि कॉल लॉग तुम्हाला कॉल टॅबमध्ये दिसेल. पण फोन वाजणार नाही.
तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही कॉल्स टॅबमधून नंबरवर कॉल बॅक करू शकता किंवा चॅटमध्ये दिसणाऱ्या ‘Silenced Unknown Caller’ मेसेजवर टॅप करून कॉल डिटेल्स पाहू शकता.
Airtel ग्राहकांसाठी गुड न्यूज! फ्री मिळेल 4 हजार रुपयांचा Adobe Express प्रीमियम
लक्षात ठेवा की, तुम्ही एखाद्या अनोळखी नंबरवर वैयक्तिकरित्या कॉल केला किंवा मेसेज पाठवला तर त्या नंबरवरून येणारे कॉल आता सायलेंट केले जाणार नाहीत. शिवाय, तुम्हाला व्हॉट्सअॅप यूझरकडून कॉल नको असतील तर तुम्ही ते ब्लॉक करू शकता.
