लॅपटॉप स्लो का होतो?
लोकांना वाटतं की, लॅपटॉप खराब झाला म्हणजे हे हार्डवेयरमुळे होत असेल. पण प्रत्येकवेळी असं होत नाही. अनेक प्रकरणांमध्ये बॅकग्राउंडमध्ये चालत असलेल्या अनावश्यक अॅप्स, फूल स्टोरेज आणि जंक फाइल्समुळे सिस्टम स्लो होते. म्हणूनच वेळेबरोबर लॅपटॉपची स्पीड कमी होते.
नवा फोन खरेदी करताय? आधी पाहा हे 5 फीचर्स, नाहीतर पैसे जातील वाया
advertisement
स्टार्टअप अॅप्स कंट्रोल करणे गरेजेचे
- लॅपटॉप ऑन करतो तेव्हा अनेक अॅप्स आपोआप सुरू होतात आणि सिस्टमचा लोड वाढतो.
- Task Manager (Ctrl + Shift + Esc) ओपन करा .
- Startup टॅबमध्ये जा.
- गरज नसलेले अॅप्स Disable करा.
- यामुळे तुमचा लॅपटॉप वेगाने बूट होईल आणि सुरुवातीलाच सिस्टमवर दबाव येईल
WiFi Router किती वर्षात बदलावं? चेंज केल्याने स्पीड वाढते? जाणून घ्या डिटेल्स
जंक फाइल्स आणि कॅशे क्लियर करा
- लॅपटॉपमध्ये टम्पररी फाइल्स आणि कॅश जमा होतात, ज्यामुळे स्टोरे फूल होते.
- सर्च बारमध्ये Disk Cleanup लिहा.
- मुख्य ड्राइव्हमधून अनावश्यक फाइल्स काढून टाका.
- ब्राउझर हिस्ट्री आणि कुकीजही क्लियर करा.
- हार्ड ड्राइव्ह जास्त भरली असल्यास, जुन्या फाइल्स क्लाउड किंवा एक्सटर्नल ड्राइव्हमध्ये शिफ्ट करा.
व्हिज्युअल इफेक्ट्स कमी करा, स्पीड वाढवा : विंडोजच्या अॅनिमेशन आणि ग्राफिक्स दिसायला चांगला वाटतात, पण जुन्या लॅपटॉपवर ओझं बनतात. System Properties मध्ये जा. ‘Adjust for best performance’ ऑप्शन निवडा. पॉवर सेटिंग्समध्ये ‘Best Performance’ मोड ऑन करा. यामुळे लॅपटॉपची स्पीड सुधारेल, पण लूक थोडा सिंपल दिसेल.
सॉफ्टवेयर अपडेट आणि स्वच्छता गरजेची : फक्त सेटिंग्स बदलणे पुरेसे नाही. लॅपटॉपची देखरेखही गरजेची आहे. वेळोवेळी OS आणि ड्रायव्हर्स अपडेट करा. व्हेंट्स आणि फॅनमधील धूळ स्वच्छ करा. यामुळे लॅपटॉप ओव्हरहिट होणार नाही आणि परफॉर्मेंस टिकून राहील. तुमचा लॅपटॉप स्लो झाला असेल तर सर्वात आधी लहान-लहान उपाय अवश्य करा. जास्तीत जास्त प्रकरणांमध्ये यामुळेच काम होते आणि तुम्हाला नवा लॅपटॉप खरेदी करायची गरज पडत नाही. थोडीशी काळजी आणि योग्य सेटिंग्स केल्याने तुमची सिस्टम पुन्हा नव्यासारखी काम करेल.
