पद्धत काय आहे?
तुम्ही काही सोप्या स्टेप्स फॉलो करून टेलिमार्केटरकडून येणारे कॉल ब्लॉक करू शकता. तुम्ही मेसेजेस देखील ब्लॉक करू शकता. हे करण्यासाठी, प्रथम तुमच्या सर्व्हिस प्रोव्हायडरला वेबसाइटला भेट द्या. DND विभागात जा आणि तुमचा नंबर एंटर करा. प्राप्त झालेला OTP एंटर करा आणि प्रमोशनल कॉल आणि मेसेजेस ब्लॉक करा. तुम्ही Jio यूझर असाल, तर तुम्ही हे अॅपद्वारे देखील करू शकता.
advertisement
Netflix सब्सक्रिप्शन फ्रीमध्ये हवंय? Jio ने आणलाय जबरदस्त प्लॅन
SMS द्वारे ब्लॉक करा
तुम्हाला वेबसाइट किंवा अॅपद्वारे DND अॅक्टिव्हेट करायचा नसेल, तर SMS देखील एक पर्याय आहे. तुमच्या रजिस्टर्ड मोबाइल नंबरवरून फक्त START 0 हा क्रमांक 1909 वर पाठवा. तुम्हाला तरीही स्पॅम किंवा मार्केटिंग कॉल येत असेल, तर मेसेजमध्ये UCC, कॉलर आणि डेट/मंथ लिहा. "कॉलर" च्या जागी तुम्हाला ज्या नंबरवरून कॉल आला आहे तो नंबर लिहा.
WhatsApp आणि Facebook वर आलंय जबरदस्त फीचर! सिक्योरिटी होणार डबल
तुम्ही फोनद्वारे देखील ब्लॉक करू शकता
तुम्हाला वेबसाइट किंवा SMSद्वारे स्पॅम कॉल ब्लॉक करणे कठीण वाटत असेल, तर तुम्ही 1909 वर कॉल करून ते करू शकता. कॉलवरील सूचनांचे पालन करा आणि थोड्याच वेळात तुमच्या नंबरवर DND अॅक्टिव्ह होईल, स्पॅम कॉल आणि मेसेज थांबतील.
