Instagramचा नवीन PG-13 कंटेंट नियम काय आहे?
मेटाने एका ब्लॉग पोस्टमध्ये म्हटले आहे की, 13 ते 17 वयोगटातील यूझर्सना आता प्रौढ केंटेंट, ड्रग्ज, हिंसाचार किंवा धोकादायक स्टंट असलेला कंटेंट दिसणार नाही. कंपनीने त्याचे वर्णन PG-13 चित्रपटांसारखेच अनुभव असे केले आहे. याचा अर्थ किशोरांना सामान्य "13+" चित्रपटासारखाच कंटेंट दाखवला जाईल. मुलांची सुरक्षितता आणि मानसिक आरोग्य लक्षात घेऊन हे पाऊल उचलण्यात आले आहे.
advertisement
तुमचं राउटरही करतंय हेरगिरी! Wi-Fi सिग्नल आता सांगेल रुममधील स्थिती, पण कसं?
पालकांच्या परवानगीशिवाय सेटिंग्ज बदलता येणार नाहीत
टीन्स यूझर आता स्वतःहून त्यांच्या कंटेंट सेटिंग्ज बदलू शकणार नाहीत. एखाद्या मुलाला अधिक स्पष्ट कंटेंट पहायचे असेल तर त्यांना पालकांची परवानगी घ्यावी लागेल. मेटाने पालकांसाठी एक नवीन लिमिटेड कंटेंट मोड देखील जोडला आहे, ज्यामुळे ते त्यांच्या मुलांचा अॅक्सेस आणखी मर्यादित कंटेंटपर्यंत मर्यादित करू शकतात. हे त्यांना कमेंट्स पाहणे, टाकणे किंवा रिसिव्ह करण्यापर्यंतची अनुमती देखील मर्यादित केली जाऊ शकते.
कोणत्या प्रकारचा कंटेंट ब्लॉक किंवा हाइड केला जाईल?
मेटाने म्हटले आहे की, कठोर भाषा, धोकादायक स्टंट किंवा ड्रग्जशी संबंधित कंटेंट असलेल्या पोस्ट आता लपवल्या जातील किंवा प्लॅटफॉर्मवर शिफारस केल्या जाणार नाहीत. गांजा, अल्कोहोल आणि रक्तरंजित शब्द देखील सर्च रिझल्टमधून काढून टाकले जातील. चुकीचे स्पेलिंग केलेले शब्द देखील फिल्टर केले जातील.
Apple देतंय घरबसल्या कोट्याधीश बनण्याची संधी! फक्त करावं लागेल 'हे' काम
टीन्स देखील या अकाउंट्सना फॉलो करु शकणार नाहीत
मेटाच्या नवीन अपडेट अंतर्गत, टीनेजर्स मुले यापुढे age-inappropriate content वारंवार पोस्ट करणाऱ्या अकाउंट्सना फॉलो करू शकणार नाहीत. एखाद्या खात्याच्या बायो किंवा लिंकमध्ये OnlyFans सारख्या वेबसाइटचा उल्लेख असेल तर किशोरवयीन मुले त्यांना पाहू, फॉलो करू किंवा मेसेज करू शकणार नाहीत. जरी ते आधीच त्यांना फॉलो करत असले तरी, त्यांच्या पोस्ट आणि कमेंट्स आता दिसणार नाहीत.
PG-13 कंट्रोल AI चॅट्स आणि अनुभवांवर देखील लागू होतील
मेटाने त्यांच्या ब्लॉग पोस्टमध्ये स्पष्ट केले की, हे नवीन कंटेंट फिल्टर पोस्टपुरते मर्यादित राहणार नाही. PG-13 स्टँडर्ड आता AI चॅट्स आणि परस्परसंवादांना देखील लागू होतील. याचा अर्थ असा की किशोरवयीन मुलांशी संवाद साधणारे एआय सहाय्यक यापुढे मुलांसाठी अयोग्य वाटणाऱ्या प्रश्नांची उत्तर देणार नाहीत. डिजिटल स्पेसमध्ये मुलांसाठी सुरक्षित आणि निरोगी ऑनलाइन वातावरण प्रदान करणे हे कंपनीचे ध्येय आहे.