सर्वात स्वस्त येथे उपलब्ध आहे
आयफोन 16 Amazon वर 77,400 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत लिस्ट आहे. याशिवाय फोनच्या खरेदीवर 5,000 रुपयांपर्यंतची इंस्टंट सूट दिली जात आहे. अशा प्रकारे, नवीन iPhone 16 तुम्ही 72,400 रुपयांच्या किमतीत घरी आणू शकतात. त्याच वेळी, iPhone 15 चा 256GB व्हेरिएंट देखील त्याच किंमतीत खरेदी केला जाऊ शकतो. तुम्हाला AI फीचरने सुसज्ज असलेला iPhone 16 स्वस्तात घ्यायचा असेल, तर तुम्ही या ऑफरचा लाभ घेऊ शकता.
advertisement
5 हजारांनी स्वस्त मिळतोय OnePlus Pad Go, पाहा कुठे सुरुये ऑफर
iPhone 16 चे फीचर्स
iPhone 16 तीन स्टोरेज व्हेरिएंट्समध्ये खरेदी केला जाऊ शकतो. यामध्ये 128GB, 256GB आणि 512GB चा समावेश आहे. हा आयफोन अॅपल इंटेलिजेंस फीचरने सुसज्ज आहे आणि नवीन कॅप्चर बटणासह येतो. फोनमध्ये 6.1 इंचाचा सुपर रेटिना XDR डिस्प्ले आहे. फोनमध्ये डायनॅमिक आयलँड डिस्प्ले आहे. हे A18 बायोनिक चिपसह येते आणि iOS 18 वर काम करते.
10 हजारांच्या आत येतात या भारी स्मार्टटीव्ही! कमी पैशांत मिळेल चांगला ऑप्शन
iPhone 16 च्या मागील बाजूस ड्युअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात 48MP मेन फ्यूजन कॅमेरा आहे. जो 2x टेलिफोटो झूम फीचरला सपोर्ट करतो. याशिवाय फोनमध्ये 12MP अल्ट्रा वाइड कॅमेरा आहे. या iPhone मध्ये सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 12MP कॅमेरा असेल. आयफोन 16 मध्ये गेल्या वर्षीच्या आयफोन 15 पेक्षा चांगली बॅटरी आहे. तसेच, हे यूएसबी टाइप सी फास्ट चार्जिंग फीचरवर काम करते.