काही महिन्यांपूर्वीच अॅपल कंपनीची आयफोन 16 सीरिज भारतासह जगभरात सादर झाली. आता लवकरच अॅपल कंपनी आयफोन एसई 4 हा किफायतशीर आयफोन सादर करणार आहे. कंपनीने अधिकृत घोषणा केलेली नाही; मात्र रुमर्स खऱ्या आहेत असं मानलं तर हा फोन 2025मध्ये लाँच केला जाऊ शकतो. तसंच, हा फोन अत्यंत उत्तम अपग्रेड्ससह सादर केला जाऊ शकतो, असंही काही लीक्समध्ये म्हटलं आहे. यातील कोणतीही माहिती अॅपलकडून अद्याप अधिकृतरीत्या देण्यात आलेली नाही.
advertisement
किती असणार किंमत?
अॅपल आयफोन एसई 4 या फोनची किंमत 499 डॉलर्स म्हणजेच 49,900 रुपये असू शकते. हा फोन कंपनी स्वतःच्या मॉडेमसह सादर करू शकते, असं म्हटलं जात आहे. त्याचं कोडनेम Centauri असं आहे. या फोनमध्ये फाइव्ह जी, वायफाय, ब्लूटूथ, जीपीएस सपोर्टदेखील असेल.
अँड्रॉइड फोनच्या चार्जरनेही चार्ज करणं शक्य
अॅपल आयफोन एसई 4 या फोनमध्ये 48 एमपीचा कॅमेरा असण्याची शक्यता आहे. तसंच, 12 एमपीचा फ्रंट कॅमेरा असेल. असं सांगितलं जात आहे, की या फोनमध्ये यूएसबी सी चार्जिंग पोर्ट मिळण्याची शक्यता आहे. हे मोठं अपग्रेडेशन असेल. लायटिंग पोर्ट हटवलं जाणार आहे. तसंच, हा फोन आयपॅड, मॅकबुक आणि अँड्रॉइड फोनच्या चार्जरनेही चार्ज करणं शक्य होणार आहे.
होम बटणच्या जागी फेस आयडी देणार
या फोनचं डिझाइन आयफोन 14 प्रमाणेच असेल. फोनचा 4.7 इंच आकाराचा एलसीडी स्क्रीन अपग्रेड करून नव्या फोनमध्ये 6.1 इंच आकाराच ओएलईडी डिस्प्ले दिला जाऊ शकतो. तसंच, होम बटणच्या जागी फेस आयडी दिला जाऊ शकतो.
फोनमध्ये रायटिंग टूल
अॅपल आयफोन एसई 4 या फोनमध्ये कंपनीचा लेटेस्ट ए 18 चिपसेट असू शकतो. 8 जीबी रॅमसह अॅप इंटेलिजन्स फीचरही फोनमध्ये असेल. त्याशिवाय फोनमध्ये रायटिंग टूल, जेनमोजी, फोटो क्लीन अप आणि नवी सिरीज असेल.
