कॅलिफोर्नियामध्ये सुरू असलेल्या एका संघीय खटल्याच्या सुनावणीच्या भाग म्हणून प्रसिद्ध झालेल्या कागदपत्रांमध्ये ही माहिती उघड झाली आहे. या कागदपत्रांमध्ये मार्च 2025 मध्ये इंस्टाग्राम प्रमुख अॅडम मोसेरी यांच्या साक्षीतील काही उतारे समाविष्ट आहेत.
कंपनीचे मत
साक्ष देताना Mosseri म्हणाले की, कंपनी सामान्यत अशा प्रकारच्या सर्व्हेच्या रिझल्टला सार्वजनिक करत नाही. त्यांनी असंही मान्य केलंय की, यूझर्सद्वारे दिलेल्या माहितीवर आधारित सर्व्हे अनेकदा पूर्णपणे अचूक नसतो.
advertisement
तुमचं मुल वारंवार फोन मागतं का? फॉलो करा 3 ट्रिक, सुटेल सवय
इंस्टाग्रामची मालक कंपनी Meta वर पहिलेच आरोप आहे की, त्यांच्या प्लॅटफॉर्मवर तरुणांच्या मानसिक आरोग्यावर नकारात्मक परिणाम टाकू शकतो. अमेरिकेत कंपनीच्या विरोधात हजारो खटले दाखल आहेत. ज्यामध्ये आरोप आहे की, त्याच्या प्रोडक्टला अशा प्रकारे डिझाइन केले आहे की, ते तरुणांना जास्त वेळ बांधून ठेवेल.
डेटा कुठून आला?
कंपनीचे प्रवक्ता Andy Stone नुसार, हा आकडा पोस्टच्या थेट समिक्षेतून नाही तर यूझर्सच्या अनुभवावर आधारित सर्व्हेतून घेतला गेला आहे. म्हणजेच टिनेजर्सने स्वतः सांगितले की, त्यांना फ्लॅटफॉर्मवर आपत्तिजनक कंटेट दिसला.
मेटाने असेही जाहीर केले की ते 2025 च्या अखेरीस नग्नता किंवा स्पष्ट लैंगिक क्रियाकलाप असलेले फोटो आणि व्हिडिओ काढून टाकतील, जरी ते एआय द्वारे तयार केले गेले असले तरीही. तसंच, वैद्यकीय किंवा शैक्षणिक संदर्भात काही अपवाद केले जाऊ शकतात.
TV ची स्पीड खुप स्लो झालीये का? या ट्रिकने होईल सुपर फास्ट
मानसिक आरोग्याच्या चिंता
याच साक्षीतून असेही दिसून आले की अंदाजे 8 टक्के किशोरवयीन यूझर्सने इंस्टाग्रामवर एखाद्या व्यक्तीला स्वतःला इजा करताना किंवा तसे करण्याची धमकी देताना पाहिले आहे. ही आकडेवारी सोशल मीडिया आणि मानसिक आरोग्य यांच्यातील संबंधांबद्दल गंभीर प्रश्न उपस्थित करते.
Mosseri ने असेही सांगितले की, जास्तीत जास्त आपत्तीजनक कंटेंट खासगी मेसेजच्या माध्यमातून शेअर केली जाते. अशावेळी कंपनीला कंटेंटची निगरानी आणि यूझर्सच्या गोपनीयतेचे संरक्षण करणे यामध्ये संतुलन राखावे लागेल, कारण बरेच लोक त्यांचे खाजगी संदेश वाचू इच्छित नाहीत.
