TRENDING:

Megapixel म्हणजे नक्की काय? 200MP कॅमेरा खरंच भारी की फक्त मार्केटिंगचा फंडा?

Last Updated:

प्रश्न पडतो की जास्त मेगापिक्सल म्हणजेच नेहमीच चांगली फोटो क्वालिटी का? की हा फक्त मार्केटिंगचा भाग आहे? चला, सोप्या भाषेत समजून घेऊ.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : आजच्या काळात स्मार्टफोन हा आपल्या दैनंदिन आयुष्याचा अविभाज्य भाग बनला आहे. फोन घेण्याच्या वेळी सर्वात महत्त्वाचा फीचर म्हणजे त्याचा कॅमेरा. बहुतेक लोक कॅमेराची क्वालिटी पाहाताना सर्वात आधी मेगापिक्सल (Megapixel) वर लक्ष देतात. पण खरंच फक्त मेगापिक्सलच सर्व काही ठरवतो का?
प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो
advertisement

आज जवळजवळ प्रत्येक मिड-रेंज आणि प्रीमियम फोनमध्ये 50MP कॅमेरा मिळतो, तर काही कंपन्या 200MP कॅमेरा देत आहेत. मग प्रश्न पडतो की जास्त मेगापिक्सल म्हणजेच नेहमीच चांगली फोटो क्वालिटी का? की हा फक्त मार्केटिंगचा भाग आहे? चला, सोप्या भाषेत समजून घेऊ.

मेगापिक्सल म्हणजे काय?

1 मेगापिक्सल = 10 लाख पिक्सल.

डिजिटल फोटो हे असंख्य छोट्या पिक्सल्सपासून बनलेले असतात. जसं मोज़ेक आर्टमध्ये छोटे टाइल्स मिळून मोठं चित्र तयार होतं, तसंच फोटोमध्ये पिक्सल्स काम करतात. जास्त पिक्सल म्हणजे फोटोमध्ये जास्त डिटेल्स. पण याचा अर्थ असा नाही की फक्त मेगापिक्सलच फोटो क्वालिटी ठरवतो.

advertisement

जास्त मेगापिक्सल म्हणजेच चांगला फोटो का?

तर नेहमीच नाही! फोटो क्वालिटी ठरवण्यासाठी लेंसची क्वालिटी, सेन्सरचा आकार, प्रकाश (Light) आणि इमेज प्रोसेसिंग सॉफ्टवेअर यांचा देखील मोठा वाटा असतो. अनेकदा कमी मेगापिक्सलचा पण उत्तम टेक्नॉलॉजी असलेला कॅमेरा, जास्त मेगापिक्सलच्या कॅमेऱ्यापेक्षा चांगली कामगिरी करतो.

सोशल मीडिया किंवा दैनंदिन वापरासाठी 12MP ते 20MP कॅमेरा पुरेसा असतो. तुम्हाला मोठ्या पोस्टरमध्ये फोटो प्रिंट करायचे नसतील किंवा फार क्रॉप करायची गरज नसेल, तर जास्त मेगापिक्सल घेण्याची गरज नाही.

advertisement

मेगापिक्सल कधी महत्त्वाचे ठरतात?

-मोठे पोस्टर प्रिंट करायचे असतील

-फोटो मोठ्या प्रमाणात क्रॉप करायचा असेल

-प्रोफेशनल फोटोग्राफी (फॅशन, प्रॉडक्ट शूट्स इ.)

-अशा वेळी जास्त मेगापिक्सल उपयोगी पडतात.

-सामान्य वापरकर्त्याला किती मेगापिक्सल पुरेसे?

-फक्त ऑनलाइन शेअरिंग किंवा डिजिटल अल्बमसाठी: 12MP पुरेसा.

मोठं झूम इन / प्रिंटिंगसाठी: 20MP किंवा त्यापेक्षा जास्त.

लक्षात ठेवा

advertisement

जास्त मेगापिक्सल म्हणजे फोटो फाईलचा साईजही जास्त, स्टोरेज अधिक लागणार, ट्रान्सफर स्लो होणार आणि एडिटिंगही जड होणार. शिवाय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स फोटो कंप्रेस करतात, त्यामुळे हाय-मेगापिक्सलचा फायदा पूर्ण मिळत नाही.

जास्त मेगापिक्सल स्मार्टफोनमध्ये खरंच कामाला येतात का?

स्मार्टफोन कंपन्या नेहमी 108MP किंवा 200MP कॅमेरा हायलाइट करतात. पण प्रत्यक्षात क्वालिटी ठरते सेन्सरचा आकार, पिक्सलचा आकार आणि सॉफ्टवेअर प्रोसेसिंगवर.

advertisement

उदा.iPhone च्या कॅमेऱ्याला फार हाय मेगापिक्सल नसतो, पण फोटो क्वालिटी अनेकदा 200MP असलेल्या इतर फोनपेक्षा चांगली दिसते. कारण iPhone मध्ये चांगला सेन्सर आणि उत्कृष्ट प्रोसेसिंग असते.

मोठे पिक्सल जास्त प्रकाश कॅप्चर करतात, ज्यामुळे लो-लाईटमध्येही फोटो ब्राइट आणि शार्प मिळतो. हे अगदी सोपं उदाहरण आहे. पावसाचं पाणी पकडायला मोठी बादली असेल तर जास्त पाणी मिळेल; तसंच कॅमेऱ्यात मोठे पिक्सल म्हणजे चांगली फोटो क्वालिटी.

मराठी बातम्या/टेक्नोलॉजी/
Megapixel म्हणजे नक्की काय? 200MP कॅमेरा खरंच भारी की फक्त मार्केटिंगचा फंडा?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल