बग्स आणि डेटा रिस्क
अनेकदा फोनच्या जुन्या व्हर्जनमधील बगमुळे तुमचा फोन हँग होऊ लागतो आणि डेटा डिलीट होण्याचा धोका वाढतो. म्हणूनच फोन वेळेवर अपडेट केला पाहिजे. नवीन अपडेटमुळे स्मार्टफोनमधील बग्स दुरुस्त होतात तसेच परफॉर्मन्सही सुधारतो.
सुरक्षा धोका
मोबाइल कंपन्या दरमहा सिक्योरिटी पॅच सादर करतात. हॅकर्सपासून संरक्षण करण्यासाठी अपडेट्समध्ये सुरक्षा पॅच जोडले जातात. त्याकडे दुर्लक्ष केल्याने तुमचा फोन डेटा चोरी आणि सायबर हल्ल्याचा बळी ठरू शकतो. म्हणून सावधगिरी बाळगा आणि डिव्हाइस वेळेवर अपडेट करा.
advertisement
आता हॅकर्सची बोलती होणार बंद ! 'या' 5 टिप्सने सिक्योर होईल तुमचा फोन
कामगिरी आणि बॅटरीचे नुकसान
तुम्ही तुमचा फोन बराच काळ अपडेट केला नाही तर त्याचा कामगिरी आणि बॅटरीवर वाईट परिणाम होतो. अनेकदा मोबाईलची बॅटरी आणि प्रोसेसर ऑप्टिमाइझ करण्यासाठी नवीन अपडेट्स देखील केले जातात. जर तुम्ही या अपडेट्सकडे दुर्लक्ष केले तर फोन आणि बॅटरी दोन्ही हळू काम करू शकतात.
तुम्हाला नवीन फीचर्सचा फायदा मिळणार नाही
स्मार्टफोन कंपन्या दरमहा अपडेटमध्ये सुरक्षा पॅचसह नवीन फीचर्स आणि उत्तम यूझर एक्सपीरियन्स जोडतात. तुम्ही तुमचा फोन अपडेट केला नाही तर तुम्ही नवीन फीचर्सचा फायदा घेऊ शकणार नाही.
Reel चं दुकान होणार बंद, Instagram-Facebook वर आणणारी बंदी, नवीन कायदा आणतोय 'हा' देश!
अॅप्समधील समस्या
तुमचा फोन वेळेवर अपडेट न केल्याने अॅप कंपॅटिबिलिटीमध्ये समस्या निर्माण होतात. बहुतेक अॅप्स लेटेस्ट OS व्हर्जननुसार देखील बनवले जातात. हेच कारण आहे की जुन्या सॉफ्टवेअर अपडेट्सवर अॅप्स क्रॅश होऊ लागतात. कधीकधी अॅप्स मध्येच काम करणे थांबवतात.
