TRENDING:

20 हजारांहून कमी किंमतीत खरेदी करा हा Smart Tablet! पाहा कुठे मिळतंय बंपर डिस्काउंट

Last Updated:

OnePlus Pad Go Discount:OnePlus चा अद्भुत टॅबलेट OnePlus Pad Go खरेदी करण्याची ही एक सुवर्णसंधी आहे. हा टॅब 20,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत उपलब्ध आहे. चला जाणून घेऊया त्याचे दमदार फीचर्स आणि ते कुठे खरेदी करायचे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Bumper Discount on OnePlus Pad Go: तुम्हाला स्वस्तात पॉवरफूल आणि उत्तम फीचर्स असलेला टॅबलेट खरेदी करायचा असेल, तर OnePlus Pad Go तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय असू शकतो. या टॅबच्या 8GB रॅम आणि 256GB स्टोरेजवर बंपर डिस्काउंट उपलब्ध आहे. तुम्ही 20,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत Amazon वर ऑर्डर करू शकता. OnePlus Tab ची उत्तम फीचर्स आणि अतिरिक्त ऑफरचा फायदा कसा घ्यायचा ते जाणून घेऊया.
वनप्लस पॅड गो
वनप्लस पॅड गो
advertisement

OnePlus Pad Go ची पॉवरफूल बॅटरी

या टॅबलेटमध्ये क्रॉस-स्क्रीन कनेक्शन आणि उद्योगातील आघाडीची 2.4K आय-केअर डिस्प्ले आहे. यात 8000mAh ची मोठी बॅटरी आहे. जी एका दिवसापेक्षा जास्त काळ बॅकअप देऊ शकते. उत्तम ऑडिओ अनुभवासह डॉल्बी अ‍ॅटमॉस सपोर्ट उपलब्ध आहे. याशिवाय, स्लीक डिझाइन आणि प्रीमियम बिल्ड देण्यात आले आहे.

WhatsApp Trick: नेट ऑन असुनही येणार नाही मेसेज! दिसेल फक्त सिंगल टिक

advertisement

बंपर डिस्काउंटवर खरेदी करण्याची संधी

वनप्लस पॅड गो चे 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज मॉडेल अमेझॉनवर मोठ्या डिस्काउंटनंतर फक्त 19,999 रुपयांना उपलब्ध आहे. जर तुम्ही काही निवडक बँक कार्डने पैसे दिले तर तुम्हाला 2,250 रुपयांपर्यंत सूट मिळू शकते. त्यामुळे टॅबलेटची किंमत आणखी कमी होईल.

Oneplus Pad Go चे स्पेसिफिकेशन

या वनप्लस टॅबमध्ये 11.35 इंच (28.85cm) 2.4K Ultra-High Resolution डिस्प्ले आहे, जो 7:5 ReadFit स्क्रीन रेशो, 400 निट्स ब्राइटनेस 260 PPIसह येतो. चांगल्या साउंड एक्सपीरियन्ससाठी, वनप्लस टॅबलेटमध्ये वनप्लस ओम्नीबियरिंग साउंड आणि डॉल्बी अ‍ॅटमॉस क्वाड स्पीकर्स आहेत. डोळ्यांच्या सुरक्षिततेसाठी, ते TUV राईनलँड सर्टिफाइड लो ब्लू लाइट, Intelligent Brightness, DC Dimming आणि Bedtime Modeला सपोर्ट करते.

advertisement

iphone 17 घ्यायचा! भारतात इतकी असेल किंमत, अधिकृत आकडे समोर, 82 हजार ते....

शानदार परफॉर्मेंससाठी, Oneplus Pad Go मध्ये MediaTek Helio G99 प्रोसेसर आणि Andriod OxygenOS 13.2 समाविष्ट आहे. कनेक्टिव्हिटीसाठी वाय-फाय आणि 4G LTE (कॉलिंग) सपोर्ट उपलब्ध आहे. पॉवरसाठी 8000mAh बॅटरी आहे, जी 514 तासांचा स्टँडबाय टाइम आणि 33W सुपरव्हीओसी फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

advertisement

मराठी बातम्या/टेक्नोलॉजी/
20 हजारांहून कमी किंमतीत खरेदी करा हा Smart Tablet! पाहा कुठे मिळतंय बंपर डिस्काउंट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल