TRENDING:

WhatsApp यूझर्ससाठी गुड न्यूज! कॉलिंग आणि चॅटिंगसाठी कंपनीने आणलेय भारी फीचर्स 

Last Updated:

WhatsAppने आपल्या यूझर्ससाठी चॅटिंग, कॉलिंग, चॅनेल आणि स्टेटसमध्ये अनेक अपडेट्स सादर केले आहेत. आता, दुसरा यूझर फोन उचलत नसेल, तर ते त्वरित व्हॉइस किंवा व्हिडिओ नोट पाठवू शकतात.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : तुम्ही व्हॉट्सअ‍ॅप वापरत असाल, तर तुमच्यासाठी एकाच वेळी अनेक नवीन फीचर्स आले आहेत. कंपनीने सांगितले की, या फीचर्समध्ये मिस्ड कॉल मेसेज, नवीन इंटरॅक्टिव्ह स्टेटस स्टिकर्स, डेस्कटॉपसाठी एक नवीन मीडिया टॅब आणि मेटा एआयमध्ये अपग्रेडेड इमेज जनरेशन टूल्स समाविष्ट आहेत. मेटा एआय आता तुमचे कोणतेही फोटो एका लहान व्हिडिओमध्ये अ‍ॅनिमेट करू शकते जे तुम्ही तुमच्या मित्रांसह शेअर करू शकता. चला या फीचर्सविषयी डिटेल्समध्ये जाणून घेऊया.
व्हॉट्सअॅप न्यू फीचर्स
व्हॉट्सअॅप न्यू फीचर्स
advertisement

कॉलिंगसाठी हे अपडेट:

आता, कोणी तुमचा व्हॉट्सअ‍ॅप कॉल उचलत नसेल, तर तुम्ही त्यांच्यासाठी व्हॉइस किंवा व्हिडिओ नोट सोडू शकता. वेगळा मेसेज पाठवण्याऐवजी, तुम्ही इंस्टंट व्हॉइस किंवा व्हिडिओ मेसेज रेकॉर्ड करू शकता आणि तो पुढील यूझरला पाठवू शकता. याव्यतिरिक्त, संभाषणात व्यत्यय न आणता रिअ‍ॅक्शन देण्यासाठी व्हॉइस चॅट अपडेट केले आहेत आणि ग्रुप व्हिडिओ कॉल स्पीकर हायलाइट करतील.

advertisement

सिल्व्हर प्ले बटण मिळाल्यास Youtuber ची किती कमाई होते? पाहा पूर्ण कॅलक्युलेशन

चॅटसाठी हे अपडेट्स

मेटा एआय मिडजर्नी आणि फ्लक्सच्या नवीन मॉडेल्ससह अपग्रेड केले जात आहे. यामुळे एआय-जनरेटेड व्हिज्युअल्समध्ये सुधारणा होईल आणि कोणताही फोटो एका लहान व्हिडिओमध्ये अ‍ॅनिमेटेड करता येईल. डेस्कटॉपवर एक नवीन मीडिया टॅब जोडण्यात आला आहे, जो एकाच ठिकाणी डॉक्यूमेंट, मीडिया आणि लिंक्स प्रदर्शित करतो. लिंक प्रिव्ह्यू देखील सुधारण्यात आले आहेत.

advertisement

WhatsApp वर स्पॅमसह नको असलेले नंबर असे करा ब्लॉक! जाणून घ्या सोपी ट्रिक

स्टेटस आणि चॅनेल

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
केळीच्या दरात वाढ, गुळ आणि आल्याला आज काय मिळाला भाव? एका क्लिकवर चेक करा अपडेट
सर्व पहा

व्हॉट्सअ‍ॅपने स्टेटसमध्ये म्यूझिकचे लिरिक्स, क्वेश्चन प्रॉम्प्ट आणि इतर घटक यासारखे नवीन इंटरॅक्टिव्ह स्टिकर्स जोडण्याची घोषणा केली आहे. ज्यामुळे यूझर्सना इतर यूझर्सशी संवाद साधता येईल. चॅनेलमध्ये एक प्रश्न फीचर देखील जोडले गेले आहे. चॅनेल अ‍ॅडमिन आता सदस्यांकडून कोणत्याही प्रश्नाचे रिअल-टाइम रिस्पॉन्स प्राप्त करण्यास सक्षम असतील. ही फीचर्स अनेक यूझर्ससाठी उपलब्ध झाली आहेत. लेटेस्ट व्हॉट्सअ‍ॅप फीचर्सचा लाभ घेण्यासाठी अॅप अपडेटेड ठेवा.

advertisement

मराठी बातम्या/टेक्नोलॉजी/
WhatsApp यूझर्ससाठी गुड न्यूज! कॉलिंग आणि चॅटिंगसाठी कंपनीने आणलेय भारी फीचर्स 
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल