WhatsAppने या अॅपमध्ये विशेषतः अँड्रॉइड यूझर्ससाठी असे एक सिक्रेट फीचर दिले आहे. ज्याच्या मदतीने यूझर फक्त त्याच अॅपचे नेट बंद करू शकतो जे तो वापरू इच्छित नाही. या सीक्रेट फीचरचा वापर करून, तुम्ही व्हॉट्सअॅपवर येणारे मेसेज थांबवू शकता आणि फोनवर व्हिडिओ किंवा इतर ओटीटी अॅप्सचा त्रास न होता आनंद घेऊ शकता. यासाठी, तुम्हाला फक्त व्हॉट्सअॅपचा डेटा वापर रिस्ट्रिक्ट करावा लागेल. तुम्ही ते कसे करू शकता ते जाणून घेऊया...
advertisement
तुमच्या घरातील Wifi जवळही या वस्तू आहेत? 99% लोक करतात चूक, होतं मोठं नुकसान
डेटा कसा रिस्ट्रिक्ट करायचा
- यासाठी, सर्वप्रथम तुम्हाला फोन सेटिंग्जमध्ये जावे लागेल.
- आता तुम्हाला येथे कनेक्टिव्हिटी किंवा More कनेक्टिव्हिटी ऑप्शनवर क्लिक करावे लागेल.
- आता Data Usage ऑप्शन दिसेल.
- येथे तुम्हाला फोनमध्ये असलेल्या अॅप्सची यादी दिसू लागेल. आता ज्या अॅपचा डेटा वापर तुम्हाला थांबवायचा आहे त्यावर क्लिक करा.
- यानंतर, मोबाइल डेटा बंद करा.
- हे केल्याने, फोनचे नेट चालू झाल्यानंतरही, त्या अॅपला नेटचा अॅक्सेस मिळणार नाही.
नॉर्मल चार्जिंग आणि वायरलेस चार्जिंगमध्ये फरक काय? पाहा तुमच्यासाठी काय बेस्ट
डेटा ऑन केल्यानंतरही सिंगल टिक दिसेल
व्हॉट्सअॅपसाठी या सेटिंग्ज केल्यानंतर, जर कोणी तुम्हाला मेसेज पाठवला तर त्याला सिंगल टिक दिसेल. म्हणजेच मेसेज डिलिव्हर होणार नाही आणि तुम्ही त्रास न होता फोन वापरू शकाल. ही सेटिंग फक्त यूझर्सच्या फोनमध्ये वापरल्या जाणाऱ्या ऑपरेटिंग सिस्टमच्या आधारावर काम करते. स्टॉक अँड्रॉइड 14 यूझर्सना हे फीचर मिळत नाही. अशा परिस्थितीत, ते फक्त अॅपचा बॅकग्राउंड डेटा अॅक्सेस बंद करू शकतात. अॅप उघडताच, त्यांना पुन्हा व्हॉट्सअॅपवर मेसेज मिळायला सुरुवात होईल.