AI Summarize फीचर
हे फीचर AI Summarize या नावाने व्हॉट्सअॅपमध्ये जोडले गेले आहे. हे फीचर मेटा AI वर आधारित आहे आणि यूझर्सना त्यांनी मिस केलेल्या किंवा Unread असलेल्या सर्व न वाचलेल्या मेसेजचा आढावा देईल. मेटाने त्यांच्या ब्लॉगद्वारे सांगितले की या फीचरसाठी एक नवीन तंत्रज्ञान वापरले गेले आहे, ज्याला प्रायव्हेट प्रोसेसिंग म्हणतात. हे फीचर यूझर्सचे मेसेज खाजगी आणि सुरक्षित ठेवेल, जेणेकरून इतर कोणीही मेसेज अॅक्सेस करू शकणार नाही.
advertisement
सावधान! फोनमध्ये लपलेले अॅप्स चोरु शकतात तुमच्या फोटोसह वॉलेट डिटेल्स, असा करा बचाव
सर्व प्रकारच्या मेसेजेसवर काम करेल
व्हॉट्सअॅपच्या ब्लॉग पोस्टनुसार, हे AI फीचर ग्रुप आणि पर्सनल मेसेजेस दोन्हीवर काम करेल. यामध्ये, यूझर्सना मिळणारे सर्व न वाचलेले मेसेजेस ते सारांशित करेल आणि दाखवेल, जेणेकरून कोणतेही महत्त्वाचे अपडेट चुकणार नाहीत. त्यांच्या ब्लॉग पोस्टमध्ये, व्हॉट्सअॅपने यावर भर दिला आहे की मेटा एआय यूझर्सचे खाजगी मेसेजेस खाजगी ठेवेल. ही कंडेन्स्ड विंडो फक्त यूझर्सलाच दिसेल.
पूर्णपणे सुरक्षित असेल
ब्लॉग पोस्टमध्ये असे म्हटले आहे की, यूझर्सचे पर्सनल मेसेजेस खाजगी प्रक्रियेद्वारे संरक्षित केले जातील. कंपनीने दावा केला आहे की, एआय या मेसेजेसना न वाचता उत्तर देण्याचे देखील सुचवेल. कंपनीने सध्या हे फीचर अमेरिकन यूझर्ससाठी आणले आहे. ते फक्त इंग्रजी भाषेत प्राप्त झालेल्या मेसेजेसचा सारांश देऊ शकेल. सध्या, त्यात इतर भाषांसाठी सपोर्ट उपलब्ध राहणार नाही.
Laptop चार्जिंगला लावून काम केल्याने खराब होतो का? पहा एक्सपर्ट काय सांगतात
ते कसे कार्य करेल?
कंपनीने दावा केला आहे की, ही खाजगी प्रोसेसिंग एक प्रकारची संगणकीय पायाभूत सुविधा आहे. जी ट्रस्टेड एक्झिक्युशन एन्व्हायर्नमेंट (TEE) च्या धर्तीवर विकसित केली गेली आहे. व्हॉट्सअॅपने दावा केला आहे की ते पूर्णपणे सुरक्षित आहे. या फीचरमध्ये प्रवेश करण्यासाठी, यूझर्सला त्याच्या व्हॉट्सअॅपच्या चॅट सेक्शनमध्ये जावे लागेल. येथे, न वाचलेल्या मेसेजेस टॅबमधील सर्व मेसेज बुलेट किंवा लिस्ट व्ह्यूमध्ये दाखवले जातील, जेणेकरून यूझर्सला त्याचे सर्व मेसेज उघडण्याची गरज भासणार नाही आणि तो कोणताही महत्त्वाचा मेसेज चुकणार नाही.