सरप्राईज फीचर : व्हॉट्सअॅपने ग्रूप कॉलिंगसाठी एक खास फिचर सुरू केली आहे. आता वापरकर्ते गट कॉलमध्ये निवडक व्यक्ती गुप्तपणे जोडू शकतात. याचा वापर विशेष प्रसंगावर गुप्तपणे कुणाला आश्चर्यचकित करण्यासाठी करता येईल. हे फिचर विशेषत: आश्चर्य पार्टी किंवा गिफ्ट तयार करताना उपयुक्त ठरेल.
व्हिडिओ कॉलिंगसाठी नाइट मोड आणि नवीन इफेक्ट्स : व्हॉट्सअॅपने व्हिडिओ कॉलिंगसाठी नाइट मोड आणि विविध नवीन इफेक्ट्स जोडले आहेत. नाइट मोडमुळे कमी प्रकाशातही उच्च गुणवत्ता असलेल्या व्हिडिओ कॉल्सचा अनुभव मिळवता येईल. त्यात पप्पी कान, मायक्रोफोन, आणि अंडरवॉटर अशा विविध इफेक्ट्सचा समावेश आहे. यामुळे व्हिडिओ कॉल्स अधिक मजेदार आणि आकर्षक बनतील.
advertisement
डेस्कटॉप कॉलिंग फीचर्समध्ये सुधारणा : व्हॉट्सअॅपने डेस्कटॉप वापरकर्त्यांसाठी कॉलिंग अनुभव अधिक सोपा केला आहे. आता डेस्कटॉप वापरकर्ते थेट नंबर डायल करून कॉल करू शकतात. तसेच कॉल टॅबवर क्लिक करून कॉल सुरू करता येईल. याव्यतिरिक्त, कॉल लिंक तयार करण्याची सुविधा देखील उपलब्ध होईल.
टायपिंग इंडिकेटरमध्ये सुधारणा : चॅटिंग अनुभव सुधारण्यासाठी व्हॉट्सएपने टायपिंग इंडिकेटरमध्ये एक नवीन फिचर जोडले आहे. यामुळे वापरकर्त्यांना थेट चॅटिंग करत असताना कधी आणि कोणत्या व्यक्तीने संदेश टाइप करत आहे हे पाहता येईल. ग्रूप चॅटमध्ये, संदेश टाइप करणाऱ्या व्यक्तीचा प्रोफाइल फोटो देखील दिसेल, ज्यामुळे उत्तर देताना योग्य संदेश ओळखणे सोपे होईल.
हे ही वाचा : Tractor Tips : ट्रॅक्टर खरेदी करण्यापूर्वी या गोष्टी नक्की लक्षात ठेवा, अन्यथा पैसे जातील वाया