TRENDING:

WhatsApp स्टेटस आता होणार नाहीत ब्लर! राहतील HD, फक्त फॉलो करा या स्टेप्स

Last Updated:

Upload HD Status on WhatsApp: अनेकदा व्हॉट्सअ‍ॅप यूझर्स तक्रार करतात की स्टेटसवरील फोटो आणि व्हिडिओंची क्वालिटी कमी होते. त्यामुळे तुमचा एचडी मीडिया देखील अस्पष्ट होतो. तुम्हाला यामागील कारण माहित आहे का आणि गुणवत्ता कमी न करता तुम्ही स्टेटस कसे पोस्ट करू शकता? सविस्तर जाणून घ्या...

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
WhatsApp HD Status: व्हॉट्सअ‍ॅपवर स्टेटस टाकताना, बहुतेक फोटो आणि व्हिडिओ अस्पष्ट होतात. ज्यामुळे यूझर्स नाराज होतात. जरी तुम्ही एचडी इमेज पोस्ट केली असली तरी त्याची क्वालिटी देखील कमी होते. खरं तर, व्हॉट्सअ‍ॅपवर मीडिया कॉम्प्रेस होतो. पण तुम्ही लहान सेटिंग्ज आणि स्मार्ट ट्रिक्स वापरून स्टेटसची क्वालिटी सुधारू शकता. यासाठी, तुम्हाला कोणतेही वेगळे अ‍ॅप डाउनलोड करण्याची देखील आवश्यकता नाही, फक्त तुमच्या व्हॉट्सअ‍ॅपवर जा आणि...
व्हॉट्सअॅप स्टेटस
व्हॉट्सअॅप स्टेटस
advertisement

व्हॉट्सअ‍ॅपवर स्टेटस क्वालिटी का कमी होते?

खरं तर व्हॉट्सअ‍ॅप स्टोरेज वाचवण्यासाठी, लोडिंगला गती देण्यासाठी आणि बँडविड्थ कमी करण्यासाठी इमेज आणि व्हिडिओ कॉम्प्रेस करते. ते अनावश्यक इमेज डेटा काढून टाकते. ज्यामुळे फाइलचा आकार कमी होतो परंतु क्वालिटी कमी होते. म्हणूनच तुमचे स्टेटस एचडी वरून ब्लर होते.

तुम्हीही वेळेवर फोन अपडेट करत नाहीत का? भंगार होईल फोन, होतील 5 दुष्परिणाम

advertisement

WhatsAppची ही सेटिंग बदला

तुम्ही तुमच्या व्हॉट्सअ‍ॅपमधील ही छोटी सेटिंग अद्याप बदलली नसेल, तर आत्ताच करा. यामुळे तुमच्या स्टेटसची क्वालिटी सुधारेल. फक्त या सोप्या स्टेप्स फॉलो करा:

1. सर्वप्रथम तुमच्या फोनमध्ये WhatsApp उघडा.

2. आता Settingsमध्ये जा.

3. यानंतर स्टोरेज आणि डेटा वर क्लिक करा.

4. आता मीडिया आणि क्वालिटी निवडा.

advertisement

5. आता तुम्हाला दोन ऑप्शन मिळतील, तुम्हाला फक्त HD Quality वर टॅप करावे लागेल.

इंटरनेटला सुपर-फास्ट स्पीड हवीये? आधी करा आधार व्हेरिफिकेशन, झटपट होईल काम

WhatsApp स्टेटसची क्वालिटी वाढवण्यासाठी टिप्स

ही टिप्स अवलंबून तुम्ही स्टेटस काही प्रमाणात ब्लर होण्यापासून वाचवू शकता. फक्त या स्टेप्स फॉलो करा:

1. तुमच्या स्मार्टफोनमध्ये WhatsApp उघडा.

advertisement

2. आता तुमच्या कॉन्टॅक्टमधील एखाद्याचे चॅट उघडा किंवा स्वतःचे चॅट उघडा.

3. गॅलरीमधील स्टेटसवर तुम्हाला अपलोड करायचा असलेला फोटो-व्हिडिओ निवडा.

4. वरच्या उजव्या कोपऱ्यातील एचडी ऑप्शनवर क्लिक करा आणि आता तो चॅटमध्ये पाठवा.

5. आता पाठवलेला फोटो-व्हिडिओ टॅप करा आणि धरून ठेवा, वर दिलेल्या फॉरवर्ड आयकॉनवर क्लिक करा.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
45 वर्षांपासून जपलीये तिच चव, सोलापुरातील फेमस शिक कढई, एकदा खाल तर पुन्हा याल
सर्व पहा

6. यानंतर, तो माय स्टेटस वर अपलोड करा. बस्स, तुमचे एचडी क्वालिटी स्टेटस अपलोड झाले आहे.

advertisement

मराठी बातम्या/टेक्नोलॉजी/
WhatsApp स्टेटस आता होणार नाहीत ब्लर! राहतील HD, फक्त फॉलो करा या स्टेप्स
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल