TRENDING:

Induction वापरल्यानंतर तुम्हीही मेन स्विच लगेच बंद करता? ठरू शकतं धोकादायक, पण का?

Last Updated:

Induction Maintenance: एलपीजीच्या तुटवड्यामुळे आता इंडक्शन कूकटॉपला खुप भाव आलाय. लोकं गॅसच्या कमतरतेमुळे इंडक्शन कुकटॉप खरेदी करताय. आज आपण याविषयी एक महत्वाची गोष्ट जाणून घेणार आहोत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : जगात सुरू असलेल्या युद्धांचा परिणाम भारतावरही होतोय. एलपीजी गॅसच्या पुरवठ्यात कमतरता आल्यामुळे तुटवडा निर्माण झालाय. लोकं एलपीजी गॅसची साठेबाजी करत असल्यामुळेही ही काही लोकांना वेळेवर सिलेंडर मिळत नाहीये. याच कारणामुळे आता इंडक्शन कूकटॉपची मागणी वाढलीये. अनेक लोक ते खरेदी करताय. पण त्यांना याचा योग्य वापर कसा करायचा हे माहिती नाही. अनेक लोक पहिल्यांदाच इंडक्शनचा वापर करताय. अशावेळी एक लहानशी चूक तुमचं इंडक्शन खराब करू शकते.
इंडक्शन कूकटॉप मेंटेनेंस
इंडक्शन कूकटॉप मेंटेनेंस
advertisement

इंडक्शन यूज करण्यासाठी वीज लागते. अनेक लोक जेवण तयार झाल्यानंतर वीज वाचवण्याच्या नादात थेट मेन स्विच बंद करतात. अनेकदा घाईघाईत हे केलं जातं. पण तुम्हीही असं करत असाल तर नकळत तुम्ही इंडक्शन खराब करताय. चला जाणून घेऊया इंडक्शन कस खराब होतं.

इंडक्शन स्टोव्हवर स्वयंपाक करताय? होऊ शकते शॉर्ट सर्किट, असा करा बचाव

advertisement

इंडक्शन बंद झाल्यानंतरही चालतो कूलिंग फॅन 

इंडक्शन कूकटॉप हे इलेक्ट्रॉमॅग्नेटिक टेक्नॉलॉजीवर काम करते. हे चालू असताना आतील कॉइल्स आणि इलेक्ट्रॉनिक सर्किट खूप गरम झालेले असतात. आपण इंडक्शन पॅनलच्या बटण दाबून बंद करतो, तेव्हा आतून फॅन चालू असण्याचा आवाज येतो. आतील हिट बाहेर पडावी म्हणून हा कूलिंग फॅन देतात. फॅन चालू झाल्याने इंडक्शन थंड होण्यात मदत होते.

advertisement

स्विच लगेच बंद केल्याने काय होतं?

तुम्ही थेट मेन स्विच बंद केल्यास, पंखा लगेच बंद होतो. यामुळे इंडक्शनमधील उष्णता बाहेर निघू शकत नाही. असं झाल्याने आतील सर्किट बोर्ड आणि नाजूक सेन्सरला नुकसान पोहोचू शकतं. तुम्ही नेहमीच असं करत असाल तर इंडक्शनचं मदरबोर्ड जळू सकतो. जे दुरुस्त करण्याचा खर्च खुप जास्त असतो. म्हणूनच इंडक्शन वापरत असताना योग्य ती काळजी घेणे गरजेचे असते. इंडक्शनचा वापर कसा करावा चला पाहूया.

advertisement

Induction Cooktop खरेदी करताय? आधी या गोष्टी पाहा, अन्यथा भरमसाठ येईल वीज बिल

मग काय करायचं?

  • इंडक्शनवर स्वयंपाक तयार करुन झाल्यानंतर सर्वात आधी इंडक्शनच्या डिस्प्लेवर उपलब्ध 'On/Off' किंवा 'Power' दाबा.
  • इंडक्शन तुम्ही बंद केल्यानंतर 1-2 मिनिटं फॅन चालू राहतो. फॅन हा आतील उष्णता बाहेर काढण्याचं काम करत असतो. ज्यामुळे हा फॅन बंद होण्याची वाट पाहत राहा.
  • advertisement

  • फॅनचा आवाज पूर्ण बंद झाल्यावरच मेन स्विच ऑफ करा. असं केल्याने तुमचं इंड्क्शन लवकर खराब होणार नाही. यासोबतच तुमचा दुरुस्तीचा खर्चही वाचवता येईल.
  • टॉप व्हिडीओज

    सर्व पहा
    APMC Market: द्राक्षं, केळीचं मार्केट हाललं; कांदा, लिंबूला शनिवारी किती मिळाला भाव?
    सर्व पहा

मराठी बातम्या/टेक्नोलॉजी/
Induction वापरल्यानंतर तुम्हीही मेन स्विच लगेच बंद करता? ठरू शकतं धोकादायक, पण का?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल