फिल्टर आणि कॉइल खराब असणे
एसीचं फिल्टर आणि एसीच्या आतील कॉइल खराब असेल आणि त्यात धूळ-माती जमा झालेली असेल. तेव्हा फिल्टर ब्लॉक होतं आणि गार हवा आत येऊ शकत नाही. एसी फक्त हवा फेकत राहतो पण रुम गारच होत नाही.
गॅस (रेप्रिजरेंट) कमी होणे
एसीमध्ये गॅस लिक जालं असेल किंवा कमी झालं असेल तर एसी रुम गार करू शकत नाही. 24 डिग्रीवरही खोली गार होत नाही. ही समस्या जुन्या एसीमध्ये जास्त निर्माण होते.
advertisement
Split की Window AC! 1 तास चालवल्यावर कोणाला लागते जास्त वीज? एकदा पाहाच
खोलीच्या साइजपेक्षा लहान एसी
तुमची खोली मोठी असेल एसी कमी टनचा असेल (म्हणजे 1 टन एसी AC 120-150 sq ft खलीसाठी असतो. ) तर त्यामुळे पूर्ण खोली गार होऊ शकत नाही.
खोलीत उष्णता शिरते
खिडक्या-दरवाजे खुले राहणे, पडदे न लावणे, छतावर थेट ऊन येत असेल किंवा खोलीमध्ये चांगली इंसुलेशन नसणे. बाहेरची उष्ण हवा आत येत असेल तर एसी रुम गार करू शकत नाही.
फॅन स्पीड आणि मोड चुकीचा असणे
अनेकदा लोक 'फॅन मोड' वर चालवतात किंवा फॅनची स्पीड खुप जास्त ठेवतात. यामुळे गारवा कमी येतो.
एसीचा आउटडोर यूनिट उष्ण ठिकाणी असतो
आउटडोर यूनिट थेट उन्हात असेल किंवा बंद जागेवर असेल तर एसी नीट काम करत नाही.
कूलरचा खुपच आवाज येतोय का? या ट्रिकने पैसे खर्च न करता प्रॉब्लम होईल दूर
समस्या कशी दूर करावी?
- प्रत्येक 15-20 दिवसात एसीचं फिल्टर स्वच्छ करा.
- वर्षात एकदा प्रोफेशनल सर्व्हिसिंग अश्य करुन घ्या.
- खोलीच्या खिडक्यांवर जाड पडदे लावा आणि संध्याकाळी खिडक्या बंद ठेवा.
- AC ला ‘Cool Mode’ वर 24°C वर ठेवा आणि फॅन स्पीड ‘Auto’ किंवा Medium वर ठेवा.
- गॅस कमी लागत असेल तर लगेच टेक्निशियनला बोलवा.
- खोलीची साइज पाहून योग्य क्षमतेचा एसी वापरा.
AC 24 डिग्रीवर चालतोय आणि तरीही खोली गार होत नसेलतर मोठी समस्या नाही. जास्तीत जास्त प्रकरणांमध्ये घाण, गॅसची कमतरता किंवा खोलीत उष्णता आल्याने ही समस्या निर्माण होते. तुम्ही एसीची नियमित स्वच्छता केली, सर्व्हिसिंग केली आणि खोलीला उष्णतेपासून दूर ठेवलं तर एसी चांगला गारवा देईल आणि वीज बिलही कमी येईल.
उन्हाळ्यात एसीच्या गार हवेचा आनंद घेत असताना एसीची योग्य देखभालही गरजेची आहे. वर सांगितलेले उपाय करुनही एसी कूलिंग देत नसेल तर चांगल्या टेक्निशियनला बोलवून चेक करुन घ्या.
