TRENDING:

LinkedIn वर सेफ नाही तुमचा डेटा! रिपोर्टमध्ये झाला खुलासा, पाहा नेमकं प्रकरण काय

Last Updated:

LinkedIn Privacy: आपल्यापैकी अनेक जणांचे लिंक्डइनवर अकाउंट आहेत. नोकरी संदर्भातील प्रोफाइल यावर असते. मात्र आता हे प्लॅटफॉर्मही सेफ नसल्याचं बोललं जातंय.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : नोकरी शोधायची असेल तर आता विविध ऑफिसमध्ये जावं लागत नाही. तर आपल्यापैकी बरेच लोक हे लिंक्डइनवर अकाउंट ओपन करुन आपली प्रोफाइल अपडेट करत असतात. लिंक्डइन हे प्रोफेशनल नेटवर्किंग प्लॅटफॉर्म आहे. मात्र नुकत्याच समोर आलेल्या एका रिसर्चने यावर प्रश्न उपस्थित केले आहेत. रिपोर्ट्सनुसार, प्लॅटफॉर्म यूझर्सची ब्राउजर अ‍ॅक्टिव्हिटी ट्रॅक करण्यासाठी एक खास स्क्रिप्टचा वापर करतोय.
लिंक्डइन प्रायव्हसी रिस्क
लिंक्डइन प्रायव्हसी रिस्क
advertisement

BrowserGate रिपोर्टमध्ये कोणता खुलासा झाला

जर्मन संघटना Fairlinked eV च्या BrowserGate रिपोर्ट आणि BleepingComputer ने स्पष्ट केलेय की, लिंक्डइन प्रत्येक पेज लोड करण्या दरम्यान एक JavaScript स्क्रिप्ट इंजेक्ट करत आहे. ही स्क्रिप्ट यूझरच्या ब्राउजरमध्ये इंस्टॉल हजारो Chrome एक्सटेन्शन्स स्कॅन करते. याची संख्या आता 6,000 हून जास्त असल्याचं बोललं जातंय.

इंडक्शन कूकटॉपचे असतात 3 प्रकार! चुकीचं खरेदी केल्यास पैसे जातील वाया, पाहा कोणता बेस्ट

advertisement

कोणकोणती माहिती जमा केली जातेय 

या स्क्रप्टच्या माध्यमातून फक्त एक्सटेंशन नाही तर यूझरच्या डिव्हाइसशी संबंधित महत्त्वाची माहिती घेतली जातेय. यामध्ये सीपीयू कोरची संख्या, टाइम झोन, भाषा सेटिंग, बॅटरी स्टेटस आणि सध्याच्या मेमोरी सारख्या डिटेल्सचा समावेश आहे. या सोबतच स्क्रीन साइज, स्टोरेज क्षमता आणि सिस्टमशी संबंधित इंतर टेक्निकल माहितीही जमा होते.

advertisement

एक्सटेंशन्स ओळखण्याची पद्धत

रिपोर्टनुसार, ही स्क्रिप्ट खास एक्सटेन्शन IDs शी संबंधित फाइल्स अ‍ॅक्सेस करण्याचा प्रयत्न करते. या पद्धतीने ओळखलं जाऊ शकतं की, यूझरच्या ब्राउझरमध्ये कोणकोणते एक्सटेन्शन इंस्टॉल आहेत. ही टेक्नॉलॉजी Chromium आधारित ब्राउझर्समध्ये पहिलेच ओळखची मानली जाते. रिपोर्टमध्येही दावा करण्यात आलाय की, हा डेटा HUMAN Security नावाच्या सायबर सिक्योरिटी कंपनीपर्यंत पाठवला जात आहे. खरंतर या दाव्याची स्वतंत्ररित्या पुष्टी अद्याप होऊ शकलेली नाही.

advertisement

कोणता फॅन जास्त हवा देतो, 3 Blade की 4 Blade? एकदा अवश्य घ्या जाणून

LinkedIn ने काय स्पष्टीकरण दिले?

या आरोपींवर प्रतिक्रिया देत LinkedIn ने म्हटलंय की, ते यूझर्सची प्रायव्हसी आणि प्लॅटफॉर्मची सुरक्षा टिकवून ठेवण्यासाठी असे एक्सटेंशन्स ओळखतात, जे अनुमतीशिवाय डेटा स्क्रॅप करतात. कंपनी म्हणते की, या माहितीचा वापर संवेदनशील माहिती काढण्यासाठी करत नाही.

advertisement

यूझर्सने चिंता करावी का?

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
कांद्याचे भाव पुन्हा कोसळले, लिंबू आणि केळीची काय स्थिती? एका क्लिकवर चेक करा
सर्व पहा

या संपूर्ण प्रकरणाने ऑनलाइन प्रायव्हसीविषयी नवीन वाद सुरू केला आहे. हे दावे योग्य ठरले तर यूझर्सची डिजिटल सुरक्षा आणि विश्वासासाठी मोठा मुद्दा ठरतो. अशावेळी सतर्क राहणे आणि आपल्या ब्राउझरची सेटिंग्स आणि एक्सटेंशनवर नजर ठेवणे खुप गरजेचे आहे.

मराठी बातम्या/टेक्नोलॉजी/
LinkedIn वर सेफ नाही तुमचा डेटा! रिपोर्टमध्ये झाला खुलासा, पाहा नेमकं प्रकरण काय
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल