LinkedIn हे एक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे जिथे बहुतेक लोकांकडे अचूक माहिती असते. लिंक्डइन यूझर या प्लॅटफॉर्मवर त्यांच्या जीवनापासून ते त्यांच्या नोकऱ्यांपर्यंत प्रत्येक गोष्टीचे अपडेट शेअर करतात. म्हणून, जर एआयने हा डेटा वापरला तर तो तुमचा धोका वाढवू शकतो. याचा थेट तुमच्या गोपनीयतेवर परिणाम होऊ शकतो. कंपनी यासंबंधीच्या नियमांमध्ये सुधारणा करण्यास पूर्णपणे तयार आहे. नवीन नियमांनुसार, तुमचा डेटा केवळ प्लॅटफॉर्मवरच नाही तर एआय सिस्टमला प्रशिक्षित करण्यासाठी आणि इतर साधनांसह शेअर करण्यासाठी देखील वापरला जाईल. तसंच, जर यूझर्सची इच्छा नसेल तर त्यांचे डिटेल्स एआयला प्रशिक्षित करण्यासाठी वापरले जाऊ शकत नाहीत; यूझर्सना हे रोखण्याचा पर्याय आहे.
advertisement
'I’m Not a Robot' वर तुम्ही पण करता ना क्लिक? मग सावधान ऑगस्टपासून Unlock झालाय नवीन Scam
पर्सनल मेसेज सुरक्षित राहतील
लिंक्डइन 3 नोव्हेंबरपासून त्यांची नवीन प्रायव्हसी पॉलिसी धोरण लागू करत आहे. या पॉलिसीनुसार, प्लॅटफॉर्म आता एआय मॉडेल्सना प्रशिक्षित करण्यासाठी यूझर्सचा डेटा वापरेल. तथापि, लिंक्डइनने स्पष्ट केले आहे की या प्रशिक्षणासाठी पर्सनल मेसेज डेटा वापरला जाणार नाही.
सध्या या देशांमध्ये प्रायव्हसी लागू केली जाईल
तुमच्या माहितीसाठी, हे प्रायव्हसी पॉलिसी फक्त युरोपियन युनियन, यूके, युरोपियन इकॉनॉमिक एरिया, स्वित्झर्लंड, हाँगकाँग आणि कॅनडा सारख्या देशांमध्ये लागू केले जाईल. तसंच, यूझर्सना निवड रद्द करण्याचा पर्याय असेल. हे प्रायव्हसी धोरण लवकरच इतर देशांमध्ये देखील लागू केले जाऊ शकते.
LinkedIn त्यांच्या वेबसाइटवर अॅपच्या अटी आणि डेटा वापराची माहिती अपडेट करत आहे. कंपनी म्हणते की, काही यूझर डेटा सामग्री तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या एआय मॉडेलला प्रशिक्षित करण्यासाठी वापरला जाईल. लिंक्डइनला वाटते की यामुळे यूझर्सचा अनुभव सुधारेल आणि नवीन संधींशी कनेक्ट होणे सोपे होईल. एआय मॉडेलला प्रशिक्षित करण्याव्यतिरिक्त, जाहिरातीसाठी डेटा मायक्रोसॉफ्टसोबत शेअर केला जाईल.
सेटिंग्ज कशी बदलायची
- तुम्हाला तुमचा पर्सनल डेटा एआयला प्रशिक्षित करण्यासाठी वापरला जाऊ नये असे वाटत असेल, तर तुम्ही ते थांबवू शकता.
- हे करण्यासाठी, तुम्हाला प्रथम अॅपच्या सेटिंग्जमध्ये जावे लागेल.
- येथे प्रोफाइल आयकॉनवर क्लिक करा.
- नंतर तुम्हाला खाली सेटिंग्ज पर्याय दिसेल; त्यावर क्लिक करा.
- आता डेटा प्रायव्हसी वर जा.
- येथे तुम्हाला "data for generative AI Improvement" हा ऑप्शन दिसेल. तो उघडा.
- एक टॉगल दिसेल. तो बंद करण्यासाठी त्यावर क्लिक करा.
