'I’m Not a Robot' वर तुम्ही पण करता ना क्लिक? मग सावधान ऑगस्टपासून Unlock झालाय नवीन Scam
- Published by:Devika Shinde
Last Updated:
आपण कसलाही विचार न करता ही स्टेप पूर्ण करतो आणि आपलं काम करतो. पण अलीकडे संशोधनातून समोर आले आहे की हा सर्वसामान्य निष्क्रीया क्लिक स्कॅमर्सना फायदा देऊ शकतो.
आजकाल ऑनलाइन व्यवहार करताना किंवा एखादा फॉर्म भरताना मध्येच एक पॉप अप आल्याचं तुम्ही पाहिलं असेल. यामध्ये “I’m Not a Robot” असा मेसेज येतो. त्यावर कधी कॅप्चा टाकावा लागतो, तर कधी कार, सिग्नल यांसारख्या गोष्टींवर क्लिक करावं लागतं आणि प्रोसेसर किंवा कंप्यूटरला हे दाखवून द्यावं लागतं की आपण रोबोट नाही आणि ही प्रक्रिया आपोआप होत नाही.
advertisement
आपण देखील कसलाही विचार न करता ही स्टेप पूर्ण करतो आणि आपलं काम करतो. पण अलीकडे संशोधनातून समोर आले आहे की हा सर्वसामान्य निष्क्रीया क्लिक स्कॅमर्सना फायदा देऊ शकतो. रिसर्च्सना हे आढळलं आहे की फसवणूक करणारे आता AI-आधारित वेबसाइट-बिल्डर आणि मोफत होस्टिंग प्लॅटफॉर्मचा गैरवापर करून खूपच नकली कॅप्चा पेजेस बनवतात आणि यामुळे सामान्य लोक सहज बळी ठरू शकतात.
advertisement
advertisement
लिंकवर क्लिक केल्यावर तुम्हाला एक कॅप्चा पेज दिसतो, तो बघायला नक्कीच खरा वाटतो: “I’m Not a Robot” आणि मग तुम्ही टिक करता. परंतु त्या कॅप्चाच्या मागे नक्कीच कुठे तरी दुसरे पान लपवलेले असते. जिथे तुम्हाला पासवर्ड, OTP किंवा इतर संवेदनशील माहिती भरायला भाग पडले जाते किंवा ती कधीकधी तुमच्या फोनमधून घेतली जाते.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement