advertisement

Pune Navle Bridge : सलग दुसऱ्या दिवशी नवले पुलावर अपघात, तब्बल 5 ते 6 गाड्या एकमेकांना धडकल्या! रक्ताचा सडा अन् अनर्थ घडला

Last Updated:

Pune Navle Bridge Accident : नवले पुलावर सलग दुसऱ्या दिवशी भीषण अपघात झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या अपघातात एका दुचाकी चालकाचा जागीच मृत्यू झालाय.

Pune Navle Bridge Accident
Pune Navle Bridge Accident
Pune Navle Bridge Accident (अभिजीत पोते, प्रतिनिधी) : गेल्या काही वर्षात पुण्यातील रस्ते अपघाताचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढलं आहे. पुण्यातील अपघाताचा फेमस ठिकाण म्हणजे नवले पूल... नवले पूल चिंतेचा नाही पुणेकरांची चेष्टेचा विषय झाला आहे. अशातच अपघातांचे सत्र थांबण्याचं नाव घेत नसून, नवले पुलावर सलग दुसऱ्या दिवशी भीषण अपघात झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या अपघातात एका दुचाकी चालकाचा जागीच मृत्यू झाला असून परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर

वारंवार होणाऱ्या या घटनांमुळे आता प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. अशातच शुक्रवारी सकाळी भीषण अपघाताने अनेक प्रश्न उपस्थित होताना दिसत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, एक भरधाव ट्रक पुलावरून उतरत असताना चालकाचे नियंत्रण सुटलं आणि त्याने समोर असलेल्या वाहनांना जोरात धडक दिली. हा वेग इतका प्रचंड होता की, रस्त्यावरून जाणाऱ्या 5 ते 6 गाड्यांचे या धडकेत नुकसान झालं. या भीषण अपघातामध्ये दुचाकीला ट्रकने जोरात धडक दिल्यामुळे दुचाकी चालकाचा गंभीर दुखापत होऊन जागीच मृत्यू झालाय.
advertisement

नवले पुलावर रक्ताचा सडा

पुण्यातील नवले पूल आणि नऱ्हे परिसर हा अपघाताचा ‘ब्लॅक स्पॉट’ ठरत असल्याचे चित्र पुन्हा एकदा स्पष्ट झालं आहे. सातत्याने अपघात होत असताना देखील प्रशासन हातावर हात ठेऊन बसलंय का? असा सवाल पुणेकर विचारत आहेत. काल देखील नवले पुलावर रक्ताचा सडा सांडला होता. काल देखील नवले पुलावर कार आणि ट्रकचा भीषण अपघात झाला. चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि ती रस्त्यावरच उलटली.
advertisement

अपघातात एकाचा मृत्यू

दरम्यान, काल झालेल्या अपघतात तीन जण गंभीररित्या जखमी झाले होते. तर आज झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता पुलावरून वाहतूक बंद करावी लागणार की काय? अशी चिंता सतावू लागली आहे. प्रशासनाने या ठिकाणी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
Pune Navle Bridge : सलग दुसऱ्या दिवशी नवले पुलावर अपघात, तब्बल 5 ते 6 गाड्या एकमेकांना धडकल्या! रक्ताचा सडा अन् अनर्थ घडला
Next Article
शेअर बाजाराच्या इतिहासातील सर्वात मोठी संधी, पैसे तयार ठेवा; 34 वर्षांनंतरची प्रतिक्षा पूर्ण होणार, चालून आला गोल्डन चान्स
शेअर बाजाराच्या इतिहासातील सर्वात मोठी संधी, पैसे तयार ठेवा; 34 वर्षांनंतरची प्रतिक्षा पूर्ण होणार
  • गुंतवणूकदारांसाठी सर्वात मोठा जॅकपॉट

  • LIC आणि SBI कडून होणार शेअर्स विक्री

  • तुमचा वाटा मिळवण्यासाठी आतापासूनच प्लॅन करा

View All
advertisement