TRENDING:

YouTubeवर आलं जबरदस्त फीचर! 27 भाषांमध्ये ऐकू शकता आवडता व्हिडिओ 

Last Updated:

YouTube चा Auto-Dubbing फीचर आता सर्वांसाठी उपलब्ध झाला आहे. या फीचरमध्ये 27 भाषांचा सपोर्ट आणि जास्त नॅच्युरल AI आवाज जोडला आहे. यूझर आता आपल्या आवडीची डब भाषाही निवडू शकतात.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
YouTube Auto Dubbing Feature: युट्यूबवर सर्वच लोक व्हिडिओ पाहत असतात. यावर विविध विषयांचे व्हिडिओ उपलब्ध आहेत. काही जण एंटरटेनमेंटसाठी तर काही जण हे शिकण्यासाठी युट्यूब व्हिडिओ पाहत असतात. आता तुम्ही युट्यूब व्हिडिओ तुमच्या भाषेतही ऐकू शकता. कारण YouTube ने आपल्या AI पॉवर्ड Auto-Dubbing फीचरला सर्वांसाठी जारी केलं आहे. या टेक्नॉलॉजीच्या मदतीने व्हिडिओमधील भाषा ही तुम्ही तुमच्या ट्रान्सक्राइप आणि दुसऱ्या भाषेत डब करु शकता. आता नॉन-म्युझिक व्हिडिओ आता 27 वेगवेगळ्या भाषांमध्ये ऐकता येतात. कंपनीने एक्सप्रेसिव्ह स्पीच आणि प्रेफर्ड लँग्वेज सारखी नवीन फीचर्स देखील जोडली आहेत, ज्यामुळे व्हिडिओ पाहण्याचा अनुभव अधिक नैसर्गिक आणि कंट्रोल्ड झाला आहे.
युट्यूब
युट्यूब
advertisement

Auto-Dubbing मध्ये 27 भाषांना सपोर्ट

YouTube ने त्यांचे AI-आधारित Auto-Dubbing फीचर सर्व चॅनेल आणि सर्व दर्शकांसाठी आणले आहे. हे फीचर व्हिडिओ ऑडिओला ऑटोमॅटिक टेक्स्टमध्ये रूपांतरित करते आणि नंतर ते दुसऱ्या भाषेत डब करते. सुरुवातीला VideoCon 2023 मध्ये पायलट म्हणून सादर केले गेले होते, परंतु नंतर ते माहितीपूर्ण आणि ज्ञान-आधारित व्हिडिओंपुरते मर्यादित होते. आता, ते सर्व गैर-संगीत व्हिडिओंवर काम करेल. एकूण 27 भाषांना सपोर्ट असल्याने, प्रेक्षक त्यांच्या पसंतीच्या भाषेत अधिक कंटेंट पाहू आणि ऐकू शकतील.

advertisement

Amazonचा मोठा प्लॅन! Prime यूझर्सला फ्री मिळेल Alexa Plus AI, याचा काय होईल फायदा

AI व्हॉइस आता अधिक नैसर्गिक, Expressive Speech फीचर लाँच

यूट्यूबने डब केलेले व्हॉइस कमी रोबोटिक आणि अधिक मानवी बनवण्याचे काम केले आहे. एक्सप्रेसिव्ह स्पीच नावाचे एक नवीन फीचर जोडले गेले आहे. हे फीचर क्रिएटर्सच्या आवाजातील भावना आणि ऊर्जा अधिक चांगल्या प्रकारे कॅप्चर करण्याचा प्रयत्न करते. ते सध्या इंग्रजी, फ्रेंच, जर्मन, हिंदी, इंडोनेशियन, इटालियन, पोर्तुगीज आणि स्पॅनिश या आठ भाषांमध्ये उपलब्ध आहे. कंपनीचे म्हणणे आहे की यामुळे डब केलेले कंटेंट अधिक वास्तववादी आणि ऐकण्यास आरामदायक होईल.

advertisement

Preferred Language सेटिंगने यूजरच्या हातात कंट्रोल 

यूट्यूबने मान्य केले की पहिले Auto-Dubbing मध्ये अकाउंटच्या डिफॉल्ट भाषेच्या आधारावर डब ऑडिओ दाखवला जात होता. जो अनेक यूझर्ससाठी मर्यादित अनुभव देत होता. विशेषतः मल्टीलिंगुअल यूझर्स किंवा असे लोक जे ओरिजनल भाषेत ऑडिओ पाहू इच्छितात. हे लक्षात ठेवत आता Preferred Language सेटिंग जोडण्यात आली आहे. या माध्यमातून यूझर आपल्या आवडीची डब भाषा निवडू शकतात. गरज पडल्यावर Auto-Dubbing पूर्णपणे बंद केली जाऊ शकते. यामुळे पाहण्याचा अनुभव जास्त वैयक्तिक बनतो.

advertisement

अँड्रॉइडमध्ये लगेच बदला ही सेटिंग! स्मूद चालेल फोन, परफॉर्मेंस होईल भारी

Lip Sync टेस्टिंग आणि स्मार्ट फिल्टर्स देखील समाविष्ट 

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
रेडी-टू-कुक ब्रँड, चविष्ट पदार्थ मिळतील फक्त 85 रुपयांपासून, ठाण्यात हे लोकेशन
सर्व पहा

प्लॅटफॉर्म एका नवीन लिप सिंक फीचरची देखील चाचणी करत आहे. हे तंत्रज्ञान स्पीकरच्या लिप हालचालींना भाषांतरित ऑडिओशी जुळवण्याचा प्रयत्न करते, ज्यामुळे व्हिडिओ अधिक इमर्सिव्ह बनतात. हे फीचर इंस्टाग्राम आणि फेसबुक रील्सवर आधीच पाहिले गेले आहे. युट्यूबने असेही स्पष्ट केले आहे की त्याचे व्हिडिओ लेव्हल फिल्टर ऑटोमॅटिक ओळखते की कोणते व्हिडिओ डब केले जाऊ नयेत, जसे की म्युझिक व्हिडिओ किंवा सायलेंट व्लॉग, जिथे डबिंग काही अर्थ नाही आहे. यामुळे हे फीचर अधिक परफेक्ट बनते.

advertisement

मराठी बातम्या/टेक्नोलॉजी/
YouTubeवर आलं जबरदस्त फीचर! 27 भाषांमध्ये ऐकू शकता आवडता व्हिडिओ 
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल