ही किरकोळ वाढ का नाही?
जरी ही वाढ फक्त 2 रुपये वाटत असली तरी, तज्ञांच्या मते, त्याचा परिणाम मोठा आहे. कंपनी दररोज सुमारे 25 लाख ऑर्डर पूर्ण करते असा अंदाज आहे. अशा परिस्थितीत, कंपनी केवळ प्लॅटफॉर्म फीमधून दररोज 15 कोटी रुपयांपर्यंत अतिरिक्त उत्पन्न मिळवू शकते. वार्षिक आधारावर, हे उत्पन्न 180 ते 200 कोटी रुपयांपर्यंत पोहोचू शकते.
advertisement
खरंतर, यूझर्सने या निर्णयावर नाराजी देखील व्यक्त केली आहे. त्यांचे म्हणणे आहे की, एकीकडे प्लॅटफॉर्मवर डिस्काउंट आणि ऑफर्स कमी केल्या जात आहेत, तर दुसरीकडे प्लॅटफॉर्म शुल्कात सतत वाढ केली जात आहे.
8000 रुपयांनी स्वस्त मिळतोय 200MP कॅमेराचा जबरदस्त फोन! पाहा कुठे सुरुये ऑफर
कंपनीचा नफा लक्षणीय वाढेल
जून तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा फक्त 25 कोटी रुपयांवर आला होता, तर गेल्या वर्षी याच कालावधीत तो 253 कोटी रुपये होता. खरंतर, दुसरीकडे, कंपनीचा महसूल 4,206 कोटी रुपयांवरून 7,167 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. ब्लिंकिट आणि इतर नवीन व्यवसायांमध्ये आक्रमक गुंतवणुकीमुळे ही वाढ शक्य झाली आहे.
E20 पेट्रोल की सामान्य पेट्रोल कोणतं गाडीसाठी चांगलं? बाईक किंवा कारचे मालक असाल तर हे वाचाच
झोमॅटोची प्लॅटफॉर्म फी प्रवास
ऑगस्ट 2023: पहिल्यांदाच 2 रुपयांचे शुल्क सुरू करण्यात आले
2023 च्या अखेरीस: ते 3 रुपयांपर्यंत वाढवण्यात आले
1 जानेवारी 2024: फीस 4 रुपयांपर्यंत वाढवण्यात आले
31 डिसेंबर 2023: शुल्क तात्पुरते 9 रुपयांपर्यंत वाढवण्यात आले
यानंतर, शुल्क कायमचे 10 रुपयांपर्यंत वाढवण्यात आले
आणि आता सप्टेंबर 2025 पासून ते 12 रुपयांपर्यंत वाढवण्यात आले आहे.
