TRENDING:

Vande Bharat Express: वंदे भारत एक्स्प्रेसवर दगडफेक भोवली, तरूणाला अटक

Last Updated:

एका तरूणाला धावत्या मुंबई सीएसएमटी- साईनगर शिर्डी वंदे भारत एक्सप्रेसवर दगड मारणं चांगलंच भोवलं आहे. पोलिसांनी त्या आरोपीला ताब्यात घेतले आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
कल्याण: 23 वर्षीय तरूणाला वंदे भारत एक्सप्रेसवर दगड मारणं चांगलंच भोवलं आहे. कल्याण रेल्वे स्थानकाच्या अलीकडे असताना धावत्या ट्रेनवर एका तरूणाने दगड मारल्याची घटना घडली आहे. त्याने दगड मारल्यामुळे त्याला कल्याणच्या आरपीएफ पोलिसांनी अटक केली आहे. शुक्रवारची घटना आहे. त्याने एका डब्ब्यावर नाही तर, तब्बल चार डब्ब्यांवर दगड फेकून मारल्यामुळे ट्रेनचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. पोलिसांनी कल्याण पश्चिमेतून एका संशयिताला अटक केली आहे.
Vande Bharat Express: मुंबई-गोवा वंदे भारत एक्सप्रेस 20 कोचेसची करण्याची मागणी, प्रवाशांकडून विस्तारीकरणाची मागणी
Vande Bharat Express: मुंबई-गोवा वंदे भारत एक्सप्रेस 20 कोचेसची करण्याची मागणी, प्रवाशांकडून विस्तारीकरणाची मागणी
advertisement

रेल्वे सुरक्षा दलाने (आरपीएफ) दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी 22223 डाऊन मुंबई सीएसएमटी हून साईनगर शिर्डीला जाणारी वंदे भारत एक्सप्रेस ठाकुर्ली आणि कल्याण स्थानकादरम्यान धावत्या ट्रेनवर 23 वर्षीय तरूणाने दगडफेक केली. या दगडफेकीमध्ये तरूणाने C-1, C-3, C-4 आणि C-7 अशा चार डब्ब्यांवर दगडफेक केली आहे. ज्यामुळे ट्रेनच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या आहेत. विभागीय सुरक्षा नियंत्रण कक्ष आणि ट्रेनच्या एस्कॉर्टिंग टीमकडून घटनेची माहिती मिळाल्यानंतर, कल्याण आरपीएफ पोलीस आणि गुन्हे गुप्तचर शाखेच्या संयुक्त पथकाने परिसरात शोध मोहिम करत आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.

advertisement

पोलिसांनी केलेल्या संयुक्त शोध मोहिमेत, कल्याण स्थानकाजवळील पत्रीपुलाजवळील तुलसी बिल्डिंगजवळून एका संशयिताला अटक केली आहे. पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नाव, सनी कांबळे असे आहे. तो पुण्यातील शुक्रवार पेठेतील रहिवासी आहे. दरम्यान, कल्याण स्थानकाजवळ वंदे भारत एक्सप्रेसवर दगडफेक करताना त्या तरूणाने अंमली पदार्थांचे सेवन केले होते, अशी माहिती स्वत: आरोपीने पोलिसांना दिलेली आहे. चौकशीदरम्यान, आरोपीने अधिकाऱ्यांना सांगितले की, त्याने गुरूवारी रात्री अंमली पदार्थाचे सेवन केलेले होते. कल्याण रेल्वे स्थानकाजवळच्या परिसरात तो रेल्वे रुळाजवळ फिरत होता. ट्रेन कल्याण स्टेशनच्या दिशेने जात असताना त्याने प्रवाशांना घाबरवण्याच्या उद्देशाने ट्रॅकवरून दगड उचलले आणि वेगवेगळ्या डब्यांवर फेकले.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
'लेकीला मोठी साहेब बनवायचं' 3 वर्षांच्या चिमुकलीला सोबत घेऊन ऑटो चालवते आई, Video
सर्व पहा

आरपीएफ पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने रेल्वे परिसरात बेकायदेशीरपणे प्रवेश करून ट्रेनवर दगडफेक केल्याची कबुली दिली आहे. रेल्वे कायद्याच्या कलम 153 आणि 147 अंतर्गत कल्याण आरपीएफ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला अटक करून दंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आले, ज्यांनी त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली. त्याला कल्याणमधील आधारवाडी कारागृहात पाठवण्यात आले आहे. रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले की या घटनेमुळे कॅरेज अँड वॅगन विभागाच्या रेल्वे मालमत्तेचे नुकसान झाले आहे, ज्यामध्ये अंदाजे 20,650 रुपयांचे नुकसान झाले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास उपनिरीक्षक संदीप पाटील करत आहेत.

advertisement

मराठी बातम्या/ठाणे/
Vande Bharat Express: वंदे भारत एक्स्प्रेसवर दगडफेक भोवली, तरूणाला अटक
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल