TRENDING:

'लेकीला मोठी साहेब बनवायचं' 3 वर्षांच्या चिमुकलीला सोबत घेऊन ऑटो चालवते आई, Video

Last Updated:

दररोज सकाळी 6:30 वाजता त्या त्यांची ऑटो रिक्षा सुरू करतात. त्यांच्यासोबत त्यांची तीन वर्षांची मुलगी तेजूही रिक्षामध्ये असते.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
कल्याण : आपण आपल्या आजूबाजूला संसाराचा गाडा सुरळीत चालवा म्हणून अनेक महिलांना रिक्षा चालवताना पाहतो. अशीच काहीशी कहाणी कल्याणमध्ये राहणाऱ्या कोमल गायकवाड यांची आहे. दररोज सकाळी 6:30 वाजता त्या त्यांची ऑटो रिक्षा सुरू करतात. त्यांच्यासोबत त्यांची तीन वर्षांची मुलगी तेजूही रिक्षामध्ये असते. रिक्षाच्या आत कोमल यांनी तेजूसाठी एक लहान लाकडी सीट बनवली जिथे ती दिवसभर आईच्या शेजारी सुरक्षित बसते.
advertisement

कोमल यांचा जन्म आणि बालपण परभणीमध्ये गेले. त्यांना पुढे शिक्षण घेण्याची खूप इच्छा होती परंतु घरच्या आर्थिक परिस्थितीमुळे दहावीनंतर शिक्षण थांबवावे लागले. 2018 साली त्यांचे लग्न झाले आणि त्या कल्याणला राहायला आल्या. त्यांचा नवरा ऑटो चालवायचा आणि त्यावरच घराचा उदरनिर्वाह चालायचा.

परंतु आयुष्याने अचानक वेगळे वळण घेतले. तेजू फक्त 18 महिन्यांची असताना त्यांचे पती गावाला निघून गेले आणि परत कधीच आला नाही. या घटनेनंतर कोमल पूर्णपणे एकट्या पडल्या. छोट्या मुलीसह संसार चालवण्याची जबाबदारी त्यांच्यावर आली.

advertisement

सुरुवातीला त्यांनी सुरक्षा रक्षकाची नोकरी स्वीकारली पण तेजूला सांभाळण्यासाठी कोणीही नसल्याने ती नोकरी टिकवणे कठीण झाले. अखेर त्यांनी धाडसी निर्णय घेतला आणि भाड्याने ऑटो चालवायला सुरुवात केली. सुरुवातीला रिक्षाच्या मागे एक छोटासा पलंग तयार केला होता पण प्रवासी बसल्यावर तेजू रडायची. म्हणून नंतर कोमल यांनी त्यांच्या शेजारी एक छोटी सीट तयार करून घेतली ज्यामुळे तेजू दिवसभर त्यांच्या जवळ राहू लागली.

advertisement

आज कोमल रोज सुमारे 400 ते 500 रुपये कमावतात. अलीकडेच त्यांनी EMI वर स्वतःची रिक्षा देखील खरेदी केली आहे. त्यांचे स्वप्न खूप साधे पण मोठे आहे. तेजूला चांगल्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकवणे आणि स्वतःचे घर घेणे. लेकीला साहेब बनवणे. या दोन्ही स्वप्नांसाठी त्या दिवस-रात्र मेहनत करत आहेत.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
केळी दर घसरलेलेच, लिंबू आणि कांद्याला काय मिळाला भाव, एका क्लिकवर चेक करा
सर्व पहा

जर तुम्हाला कोमल यांच्या मुलीच्या शिक्षणासाठी मदत करायची असेल तर व्हिडिओमध्ये दिलेल्या QR कोडद्वारे किंवा नाव: कोमल ज्ञानदेव गायकवाड खाते क्रमांक : ६०४५१९४६१२७ आयएफएससी कोड: MAHB0000672 बँकेचे नाव: बँक ऑफ महाराष्ट्र या बँक तपशीलांद्वारे देणगी देऊ शकता.

advertisement

मराठी बातम्या/ठाणे/
'लेकीला मोठी साहेब बनवायचं' 3 वर्षांच्या चिमुकलीला सोबत घेऊन ऑटो चालवते आई, Video
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल