मिळालेल्या माहितीनुसार, बदलापूर शहरातील एका खासगी इंग्रजी शाळेत ही घटना घडली आहे. बदलापूर पश्चिमेच्या इंग्रजी माध्यमाच्या खाजगी शाळेची बस होती. या बसमध्ये नराधम चालकाने ४ वर्षांच्या विद्यार्थीवर अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. बसमध्ये कुणीही महिला मदतनीस नव्हती. त्यावेळी ही घटना घडली. ही शाळा बदलापूर पश्चिम भागातील पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एक खासगी शाळा आहे. शाळा सुटल्यानंतर पीडित मुलगी घरी जात होती. त्यावेळी नराधम स्कुल व्हॅनचालकाने ४ वर्षांची चिमुरडी एकटी असताना अत्याचार केले.
advertisement
पीडित चिमुरडी जेव्हा घरी पोहोचली तेव्हा तिने सगळा प्रकार पालकांना सांगितलं. ४ वर्षांच्या चिमुरडीसोबत घडलेल्या घटनेमुळे पालकांच्या पायाखालची जमीन सरकली. पीडित मुलीच्या पालकांनी लगेच पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली. बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाा आहे. नराधम व्हॅन चालकालाा पोलिसांनी अटक केली आहे.
घटनेची माहिती मिळताच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. ज्या शाळेच्या व्हॅनमध्ये चार वर्षाच्या विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार झाला ती व्हॅन फोडण्याचा प्रयत्न केला. "आम्ही शाळेची व्हॅन फोडू आरोपी आमच्या ताब्यात द्या, अशी मागणी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केली. पोलिसांकडून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना समजावण्याचा प्रयत्न सुरू आहे. याा घटनेमुळे बदलापूरमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
आरोपीला अटक, गुन्हा दाखल
"अत्यंत वाईट असा प्रसंग घडला आहे. एका चार वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार झाला आहे. शाळेच्या खासगी व्हॅन चालकाने हा प्रकार केला आहे. या प्रकरणाची प्राथमिक माहिती घेण्यासाठी आम्ही पोलीस स्टेशनमध्ये आलो होतो. आरोपी व्हॅन चालकाला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. संबंधित मुलीला वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात नेण्यात आलं आहे. या प्रकरणात कोणतीही हलगर्जीपणा करू नये, आरोपीवर कडक कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी राष्ट्रवादीच्या राष्ट्रवादीच्या उपनगराध्यक्ष प्रियांका दामले यांनी केली आहे.
"बदलापूरमध्ये हा संतापजनक प्रकार घडला आहे. ज्या शाळेत तुमच्या पाल्याला टाकताय, त्या शाळेची पूर्ण तपासणी करा. मागे घडलेल्या प्रकारानंतरही शिक्षण विभागाचा हलगर्जीपणा निदर्शनास येत आहे. शाळेची नियमावली बदलापुरात लागू झाली नाही. शाळेची नियमावली आणखी कडक झाली पाहिजे, आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार, ज्या शाळेत पीडित चिमुरडीवर अत्याचार झाले आहे, ती शाळा अनधिकृत होती, अशी माहिती राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकारी संगीता चेंदवणकर यांनी दिली.
