शहापूर: ठाणे जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. मध्य रेल्वेचे आटगाव स्टेशनवर जुन्या तिकीट घराचं आणि जिना तोडण्याचं काम सुरू असताना दुर्घटना घडली. पण अचानक जिन्याचा भाग कोसळून दुर्घटना घडली. एका मजुराचा मृत्यू झाला आहे. तर एक गंभीर जखमी आहे. जखमीला तातडीने शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.
advertisement
मिळालेल्याा माहितीनुसार, मध्य रेल्वेच्या आटगाव स्टेशनवरील जुन्या तिकीट घर पाडण्याचं काम सुरू आहे. शुक्रवारी दुपारी त्याला लागून असलेला जिन्याच्या काही भाग कोसळल्यामुळे तिथे काम करणारे दोन मजूर पुलाखाली अडकले होते. त्यापैकी सुरुवातीला एका मजुराला काढण्यात पोलिसांना यश आलं. त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाल्यामुळे त्याला शहापूर उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आलं तर दुसरा मजूर हा तिकीट घरातील जिन्याच्या कोसळलेल्या भागाखाली दाबून मृत झाला.
तुटलेल्या जुन्या लोखंडी पूलाच्या सांगाड्याखाली दबलेल्या मजुराला काढण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरू होतं.
अखेर गॅस कटरच्या सहाय्याने लोखंडी जिना कापून त्या मृत मजुराला बाहेर काढण्यात पोलिसांना यश आलं आहे. त्याचा मृतदेह घेऊन उपजिल्हा रुग्णालय इथं पोस्टमार्टमसाठी नेण्यात आलं आहे.
