TRENDING:

पश्चिम रेल्वेचा मोठा निर्णय, विरार ते सुरत थेट मेमू, प्रवाशांना दिलासा, पाहा वेळापत्रक

Last Updated:

Virar Memu Train : पश्चिम रेल्वेने विरार-सुरत मेमू गाडी आता एका टप्प्यात चालवण्याचा निर्णय घेतला आहे. 3 जानेवारी 2026 पासून थेट सेवा सुरू होणार असून प्रवाशांचा वेळ वाचणार आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
ठाणे : पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांसाठी एक दिलासादायक आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. आतापर्यंत दोन टप्प्यांत धावणारी विरार-सुरत मेमू गाडी आता थेट एका टप्प्यात धावणार आहे. पश्चिम रेल्वेने हा निर्णय प्रवाशांच्या सोयीसाठी घेतला असून तो 3 जानेवारी 2026 पासून अंमलात येणार आहे.
News18
News18
advertisement

नवीन वेळापत्रक जाहीर

पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांनी दिलेल्या माहितीनुसार गाडी क्रमांक 69141 विरार-सुरत मेमू ही सकाळी 5.15 वाजता विरार स्थानकावरून सुटेल आणि सकाळी 10.30 वाजता सुरत येथे पोहोचेल. तसेच गाडी क्रमांक 69142 सुरत-विरार मेमू ही सायंकाळी 5.30 वाजता सुरतहून सुटून रात्री 11.30 वाजता विरारला पोहोचेल.

याआधी हीच गाडी दोन टप्प्यांत चालवली जात होती. विरार-संजाण आणि संजाण-सुरत असे दोन वेगळे क्रमांक देण्यात आले होते. संजाण स्थानकात पाच मिनिटांचा थांबा असल्याने अनेक प्रवाशांना गोंधळ,गैरसोय आणि वेळेचा त्रास सहन करावा लागत होता. विशेषतहा नवीन प्रवाशांसाठी ही व्यवस्था त्रासदायक ठरत होती.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
कांद्याच्या दरात पुन्हा घसरण, तुरीचे वाढले भाव, सोयाबीनची काय स्थिती? Video
सर्व पहा

आता थेट विरार-सुरत आणि सुरत-विरार अशी एकाच टप्प्यातील सेवा सुरू झाल्याने प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र या गाडीचे अंतर सुमारे 207 किलोमीटर असल्याने या मेमू गाडीचे तिकीट सामान्य पॅसेंजर ट्रेनप्रमाणे असावे अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.

मराठी बातम्या/ठाणे/
पश्चिम रेल्वेचा मोठा निर्णय, विरार ते सुरत थेट मेमू, प्रवाशांना दिलासा, पाहा वेळापत्रक
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल