नवी मुंबई : नवी मुंबईतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. बेलापूर सेक्टर ८ परिसरात भरधाव स्कॉर्पिओ कारने फुटपाथवरून चालणाऱ्या तरुणीला चिरडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या अपघातात तीन ते चार वाहनांचं मोठं नुकसान झालं आहे. अंगावर शहारे आणणारा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नवी मुंबईतील सेक्टर ८ मध्ये १३ मार्च रोजी संध्याकाळी ५.३० वाजेच्या सुमारास ही घटना घडली. सेक्टर ८ मधील अरेंजर कॉर्नर परिसरात हा थरारक अपघात घडला असून संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. १९ वर्षीय तरुणी रस्त्यावरून जात होती.
advertisement
[video width="480" height="544" mp4="https://images.news18.com/news18marathi/uploads/2026/03/BELAPUR-ACCIDENT-CCTV-2026-03-e68cd5bc35d975d3874ed62a029f38db.mp4"][/video]
पाठीमागून आलेल्या स्कॉर्पिओने या तरुणीला मागून जोरदार धडक दिली, समोरच एक बाईक उभी होती. स्कॉपिओने या तरुणीसह दुचाकीला काही अंतर अक्षरश: फरफटत नेलं. पुढे जाऊन या स्कॉर्पिओने एक दुचाकी, एक रिक्षा तसंच पार्किंगला उभ्या असलेल्या दोन ते तीन कारना धडक देऊन थाांबली.
अंगावर शहारे आणणारा हा अपघात सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. या अपघातात तरुणी गंभीर जखमी झाली आहे. स्थानिकांनी धाव घेऊन तरुणीला स्कॉपिओच्या खालून बाहेर काढलं. तातडीने या तरुणीला बेलापूर येथील एमजीएम रुग्णालयात दाखल केलं आहे. या तरुणीवर उपचार सुरू आहे, पण प्रकृती गंभीर असल्याचं सांगितलं जात आहे.
स्कॉर्पिओमध्ये कोण होतं?
काळ्या रंगाच्या या स्कॉर्पिओमध्ये दोन तरुण असल्याची माहिती समोर आली आहे. स्थानिकांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि कारचालक आणि त्याचा मित्र अशा दोघांना ताब्यात घेतलं. स्कॉर्पिओ चालवताना अचानक चालकाचं नियंत्रण सुटलं, क्लच ऐवजी एक्सेलेटरवर पाय दिल्यामुळे ही घटना घडली असावी असा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. या प्रकरणी दोघांविरोधात विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
