कळव्यात कुटुंबासमोरच मोठा अनर्थ
कळवा येथे राहणारे मुकेश भोसले (वय 56) हे आपल्या कुटुंबासोबत घराजवळील परिसरात फिरत होते. याच दरम्यान दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात चोरट्यांनी अचानक त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी ओढून पळ काढला. चोरट्यांनी चेहऱ्यावर हेल्मेट घातले असल्याने त्यांची ओळख होऊ शकली नाही.
या घटनेमुळे भोसले कुटुंबीय हादरून गेले. परिसरातील नागरिकांनी तात्काळ कळवा पोलीस ठाण्यात घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरू आहे.
advertisement
चोरट्यांनी हिसकावलेली सोनसाखळी सुमारे एक लाख रुपयांची असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथक तयार करण्यात आले आहे अशी माहिती कळवा पोलिसांनी दिली.
सोनसाखळी चोरी रोखण्यासाठी पोलिसांचे आवाहन
शहरात वाढत्या सोनसाखळी चोरीच्या घटनांमुळे नागरिकांनी रात्रीच्या वेळी विशेष काळजी घ्यावी तसेच मौल्यवान दागिने घालून सार्वजनिक ठिकाणी फिरताना सतर्क राहावे असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
