TRENDING:

Thane News: होळीला पाण्याची पिशवी फेकून मारली, जाब विचारताच डोकं फिरलं, ठाण्यात भयंकर घडलं

Last Updated:

Thane News: होळीच्या दिवशी पाण्याने भरलेली पिशवी फेकून मारल्याचा जाब विचारल्यावरून दोन तरुणांत वाद झाला.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
ठाणे: होळीचा सण संपूर्ण महाराष्ट्रात उत्साहात साजरा झाला. परंतु, रंग टाकण्यावरून काही ठिकाणी वादाचे प्रसंग घडल्याचेही वृत्त आहे. असाच एक धक्कादायक प्रकार ठाण्यातील कापूरबावडी पोलीस ठाण्याच्या क्षेत्रात घडला आहे. होळीच्या दिवशी पाण्याने भरलेली पिशवी फेकून मारल्याचा जाब विचारल्यावर एकावर चाकू हल्ला झाला. नरेश कनोजीया असे 21 वर्षीय हल्लेखोराचे नाव असून त्याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
Thane News: होळीच्या दिवशी पाण्याची पिशवी फेकून मारली, जाब विचारताच डोकं फिरलं, ठाण्यात भयंकर घडलं
Thane News: होळीच्या दिवशी पाण्याची पिशवी फेकून मारली, जाब विचारताच डोकं फिरलं, ठाण्यात भयंकर घडलं
advertisement

ठाण्याच्या कोलशेत जवळ आझादनगर परिसरात 19 वर्षीय मिथीलेश राऊत हा वास्तव्यास आहे. होळीच्या दिवशी मिथीलेश हा परिसरात उभा होता. तेव्हा नरेशने त्याला पाण्याने भरेलेली पिशवी फेकून मारली. मिथीलेशने याबाबत पाण्याने भरलेली पिशवी मारू नको, अशी विनंती केली. यावरूनच दोघांमध्ये वाद वाढत गेला.

‘दारू पिऊन सोसायटीत येऊ नका' म्हणणाऱ्या सेक्रेटरीला बेदम मारहाण, धुळवडीला टिटवाळ्यात राडा

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
VIDEO: 25 लाखांचा विडा अन् 10 लाखांचा लिंबू, मोशी उत्सवात दीड कोटींची बोली, अशी
सर्व पहा

होळीच्या दिवशी अंगावर पाण्याची पिशवी टाकण्यावरून वाद सुरू झाला. परंतु, नरेशने थेट जवळ असणारा चाकू काढला आणि मिथीलेशवर हल्ला केला. तेव्हा मिथीलेशचा मित्र बचावासाठी आला आणि त्याने तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर याप्रकरणात कापूरबावडी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास सुरू आहे.

मराठी बातम्या/ठाणे/
Thane News: होळीला पाण्याची पिशवी फेकून मारली, जाब विचारताच डोकं फिरलं, ठाण्यात भयंकर घडलं
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल