आयश सोबत नेमकं काय घडलं?
कल्याण पूर्वे एका भटक्या श्वानाने आयशच्या पायाचा लचका तोडला होता. श्वान चावल्यानंतर त्याने तातडीने उपचार घेणे अपेक्षित होते. मात्र आयशने एकच इंजेक्शन घेतले आणि पुढील उपचार पूर्ण केले नाही. त्यामुळे त्याचा वागण्यात विचित्र बदल जाणवू लागले. पाणी पाहून भीती वाटण्यासह त्याच्या हालचाली श्वानासारख्या होत चालल्याचे आढळून आले आणि भीती पोटीच त्याने टोकाचे पाऊल उचलले.
advertisement
रेबीज हा संसर्ग झालेल्या प्राण्याच्या चाव्याव्दारे किंवा ओरखड्यामुळे होणारा संसर्ग आहे. लसीकरणामुळे तुम्हाला रेबीज होणे थांबू शकते. रेबीज विषाणू तुमच्या मेंदूला आणि मध्यवर्ती मज्जासंस्थेला संक्रमित करतो. रेबीजची पहिली चिन्हे फ्लूसारखी असू शकतात आणि त्यात अशक्तपणा, डोकेदुखी आणि ताप यांचा समावेश असू शकतो, असं डॉक्टर दिलीप चौधरी सांगतात.
पिंपरी-चिंचवडकर आता मोकळा श्वास घ्या! 85 एकरात होतोय ‘ऑक्सिजन पार्क’, नेमका प्लॅन काय?
रेबीजची प्राथमिक लक्षणे:
चावलेल्या जागी वेदना, खाज किंवा मुंग्या येणे.
फ्लूसारखी लक्षणे जसे की ताप, डोकेदुखी आणि अशक्तपणा.
पाण्याची भीती आणि अन्न/पाणी गिळण्यास अडचण.
कुत्रा चावल्यास प्रथम काय करावे आणि काय काळजी घ्यावी.
1. फार रक्त बाहेर पडत असेल तर कपड्याने तो भाग दाबून घ्या. जेणेकरून रक्त निघणे बंद होईल.
2. जखमेवर अँटीसेप्टिक सोल्यूशन जसे की डेटॉल किंवा सेवलॉन लावून नीट स्वच्छ करून घ्या.
3. आता जखम स्वच्छ बँडेजने बांधून घ्या.
4. डॉक्टरांकडे जा आणि योग्य उपचार घ्या.
5. डॉक्टर तुम्हाला टिटॅनस किंवा रेबीज व्हॅक्सिन देतील. रेबीजचे सगळे डोस घेणे विसरू नका.
6. कुत्रा चावल्याने होणाऱ्या जखमेतून बहुतेकदा पू निघण्याची भीती असते. तेव्हा जखम नीट स्वच्छ करा.
7. जखम खोलवर असेल तर दिवसातून दोनदा ड्रेसिंग करा.
हे वेळेवर उपाय केले तरी शक्यतो रेबीजच्या लक्षणांपासून सुटका होऊ शकते. बहुतांश पाळीव कुत्रा चावला म्हणून दुर्लक्ष करतात म्हणून कुत्रा कोणताही असो डॉक्टरांचा सल्ला आणि उपचार पद्धती योग्य घेणे आवश्यक आहे.





