Document Home Delivery: तहसीलदार कार्यालयाबाहेर रांग लावण्याची कटकट गेली, घरपोच मिळणार दाखला; कशी मिळणार सेवा?
- Published by:Chetan Bodke
- local18
Last Updated:
जन्म दाखला, मृत्यूचा दाखला, विवाह नोंदणी, निराधार दाखला आणि नमुना नं. 8 चा दाखला सह असे अनेक दाखले आता नागरिकांना घरबसल्या मिळणार आहेत, कसे मिळणार? जाणून घेऊया...
ठाणे: आता नागरिकांची सरकारी कार्यालयाच्या बाहेर भली मोठी रांग लावण्याची कटकट अखेर गेली आहे. जन्म दाखला, मृत्यूचा दाखला, विवाह नोंदणी, निराधार दाखला आणि नमुना नं. 8 चा दाखला सह असे अनेक दाखले आता नागरिकांना घरबसल्या मिळणार आहेत. सरकारी कार्यालयामध्ये लावयला लागणाऱ्या भलीमोठी रांगेची कटकट अखेर गेली आहे. यामुळे नागरिकांना फार मोठा दिलासा मिळाला आहे. व्हॉट्स ॲपच्या माध्यमातून नागरिकांना आपले दाखले घरपोच मिळणार आहेत. कशा पद्धतीने ही सेवा पुरवली जात आहे, जाणून घेऊया...
सरकारी कार्यालयाच्या बाहेर तासंतास लागणार्या रांगेची कटकट आता अखेर जाणार आहे. व्हॉट्स ॲपच्या चॅटबोटच्या माध्यमातून नागरिकांना सेवा मिळणार आहे. सध्या तरी ही सेवा ठाणे जिल्ह्यामध्येच सुरू केली गेली आहे. या सेवाला कशापद्धतीने प्रतिसाद मिळतोय, या आधारावरच पुढे इतरत्र जिल्ह्यांमध्ये ही सेवा पुरवली जाणार आहे. गेल्या दीड महिन्यांपासून व्हॉट्स ॲप चॅटबोटवरून ही सेवा नागरिकांना पुरवली जात आहे. आतापर्यंत 5568 नागरिकांचे वेगवेगळ्या दाखल्यांसाठी अर्ज प्राप्त झाले असून त्यापैकी 5122 नागरिकांना वेगवेगळे दाखले मिळाले देखील आहेत.
advertisement
कसा संवाद साधायचा?
अनेक सुविधा आता नागरिकांना एका क्लिकवर मिळणार आहेत. दाखल्याचे अपडेट कुठपर्यंत आहेत? दाखला किती दिवसांत हातात मिळणार? यांसह अनेक प्रश्नांची उत्तरे नागरिकांना व्हॉट्स ॲप चॅटबोटवरून मिळणार आहे. नागरिक या व्हॉट्स ॲप चॅटबोटवरून जिल्हा परिषदेसोबत थेट संवाद साधू शकणार आहेत. जे नागरिक लांबून सरकारी कार्यलयामध्ये येतात, त्यांच्यासाठी हा पर्याय फार सोयीस्कर ठरत आहे. मराठी आणि इंग्रजी भाषेमध्ये हा चॅटबोट उपलब्ध असून या माध्यमातून नागरिकांना सरकारी योजनेची माहिती, सेवा, अर्ज प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे, अर्जाची सद्यस्थिती यांसह अनेक माहिती या चॅटबोटच्या माध्यमातून नागरिकांना मिळणार आहे.
advertisement
नागरिकांना कशी मिळणार सेवा?
व्हॉट्स ॲप चॅटबोटवरून नागरिक थेट जिल्हा परिषदेसोबत संपर्क साधू शकणार आहेत. तंत्रज्ञानाच्या मदतीने नागरिक प्रशासनासोबत संवाद साधेल. कशापद्धतीने नागरिकांना जास्तीत जास्त त्रास होणार नाही, याकडे सध्या जिल्हा परिषद लक्ष देत आहे. 8263841907 या व्हॉट्स ॲप नंबरवरून नागरिक चॅटकरून आपल्याला हवी असलेली माहिती उपलब्ध करू शकणार आहेत. ही चॅटबोट सुविधा 'ठाणे डोअरस्टेप डिलिव्हरी पोर्टल'सोबत संलग्नित आहे. सर्वच दाखल्यांसाठी नागरिकांकडून अर्ज दाखल केला जात असून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.
Location :
Thane,Maharashtra
First Published :
Feb 28, 2026 4:28 PM IST
मराठी बातम्या/ठाणे/
Document Home Delivery: तहसीलदार कार्यालयाबाहेर रांग लावण्याची कटकट गेली, घरपोच मिळणार दाखला; कशी मिळणार सेवा?










