lemon : लिंबू पिळून झाल्यावर साल फेकून देताय? थांबा, सालीचे 'हे' फायदे तुम्हाला माहीत नसतील
- Published by:Devika Shinde
Last Updated:
ज्या सालीला आपण 'कचरा' समजतो, ती खरं तर आरोग्याचा आणि सौंदर्याचा खजिना आहे. संशोधनानुसार, लिंबाच्या रसापेक्षा त्याच्या सालीमध्ये 5 ते 10 पटीने जास्त जीवनसत्त्वे (Vitamins) असतात.
आता उन्हाळा सुरु झाला आहे. याकाळात लोक लिंबूसरबत किंवा लिंबाची शिकंजी पितात. यामुळे शरीर हायड्रेट आणि शांत रहातो. याशिवाय आपल्या स्वयंपाकघरात लिंबाचं स्थान अढळ असतं. कधी पाहुणे आले की झटपट लिंबू सरबत बनवण्यासाठी, तर कधी जेवणाची चव वाढवण्यासाठी आपण लिंबू वापरतो. लिंबू पिळून झालं की आपण काय करतो? अगदी सहजपणे त्याची साल कचऱ्याच्या डब्यात फेकून देतो. कारण आपल्याला वाटतं, लिंबाचा सगळा 'कस' तर रसात गेला, आता सालीचं काय काम?
advertisement
पण मित्रांनो, तुम्ही एक मोठी चूक करत आहात! ज्या सालीला आपण 'कचरा' समजतो, ती खरं तर आरोग्याचा आणि सौंदर्याचा खजिना आहे. संशोधनानुसार, लिंबाच्या रसापेक्षा त्याच्या सालीमध्ये 5 ते 10 पटीने जास्त जीवनसत्त्वे (Vitamins) असतात. मग ती साल फेकून देणं म्हणजे फायद्याचं नुकसान करण्यासारखं नाही का? चला तर मग जाणून घेऊया, लिंबाची साल तुमच्या आयुष्यात कशी 'मॅजिक' करू शकते.
advertisement
advertisement
2. सौंदर्याचा घरगुती 'ब्युटी पार्लर'महागड्या क्रीम्स लावण्यापेक्षा लिंबाची साल वापरणं केव्हाही उत्तम.जर तुमचे कोपर किंवा गुडघे काळे पडले असतील, तर लिंबाची साल तिथे चोळा. यातील नैसर्गिक 'ब्लीचिंग' गुणधर्मामुळे त्वचा उजळते.सालीची पावडर करून त्यात थोडं मध मिसळून चेहऱ्याला लावल्यास मुरुमांची समस्या कमी होते आणि त्वचा चमकदार दिसते.
advertisement
3. स्वयंपाकघरातील 'नॅचरल क्लिनर'लिंबाची साल ही नैसर्गिक स्वच्छता दूत आहे. जर तांब्या-पितळाची भांडी काळी पडली असतील, तर त्यावर थोडं मीठ आणि लिंबाची साल घासून पहा, भांडी नव्यासारखी चमकतील. मिक्सरच्या भांड्यातून किंवा फ्रिजमधून कुबट वास येत असेल, तर लिंबाची साल तिथे ठेवा किंवा थोडा वेळ फिरवून घ्या. दुर्गंधी पळून जाईल आणि सगळीकडे फ्रेश सुगंध येईल.
advertisement
लिंबाची साल कशी वापरावी?साली फेकून देण्याऐवजी तुम्ही त्या साठवून ठेवू शकता1. ड्राय पावडर: साली उन्हात वाळवून त्याची मिक्सरमध्ये पावडर करा. ही पावडर तुम्ही फेसपॅक किंवा चहामध्ये वापरू शकता.2. लिंबू चहा (Lemon Peel Tea): पाण्यात लिंबाची साल उकळून ते पाणी प्यायल्याने शरीरातील विषारी घटक (Toxins) बाहेर पडतात आणि पचन सुधारते.तसेच Medical News Today नुसार "लिंबाच्या सालीमध्ये मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन सी आणि फायबर (तंतुमय पदार्थ) असतात. त्यामध्ये अशी जैव-सक्रिय संयुगे (bioactive compounds) देखील असतात, ज्यामुळे आरोग्याला अनेक फायदे मिळू शकतात; यामध्ये मुखाचे आरोग्य सुधारणे आणि बॅक्टेरियाशी (जीवाणूंशी) लढणे यांचा समावेश होतो."
advertisement






