advertisement

खामेनेईंच्या निवासस्थानाजवळ स्फोट, तेहरान धगधगले; 'सुप्रीम लीडर' गायब होण्याने जागतिक राजकारणात खळबळ

Last Updated:

Ayatollah Ali Khamenei: इस्रायल-अमेरिकेच्या संयुक्त हल्ल्यांनंतर इराणमध्ये तणाव शिगेला पोहोचला असून राजधानी तेहरानसह अनेक शहरांत स्फोटांचे आवाज घुमले. या पार्श्वभूमीवर इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई नेमके कुठे आहेत, याबाबत सस्पेन्स वाढला आहे.

News18
News18
इस्रायल आणि अमेरिकेने इराणविरोधात युद्धाचा बिगुल वाजवल्यानंतर पश्चिम आशियातील परिस्थिती अत्यंत तणावपूर्ण बनली आहे. तेहरानसह इराणमधील अनेक शहरांमध्ये स्फोटांचे आवाज ऐकू आल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. राजधानीवर झालेल्या हल्ल्यांनंतर आता जगभराचे लक्ष एका महत्त्वाच्या प्रश्नावर केंद्रित झाले आहे. इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई नेमके कुठे आहेत?
अचानक तीव्र झालेल्या हवाई हल्ल्यांमुळे परिस्थिती अधिकच गंभीर झाली आहे. सायरनचे आवाज, लष्करी हालचाली आणि सतत येणाऱ्या स्फोटांच्या बातम्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. विशेषतः हल्ल्यानंतर खामेनेई सार्वजनिकरित्या दिसले नसल्याने आणि त्यांच्या कार्यालयाकडून कोणतीही अधिकृत माहिती न आल्याने तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.
इराणने प्रत्युत्तरादाखल इस्रायलवर 100 हून अधिक क्षेपणास्त्र डागल्याची माहिती समोर आली आहे. अमेरिकन-इस्रायलच्या संयुक्त कारवाईनंतर खामेनेई कुठे आहेत, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. काही मीडिया अहवालांनुसार हल्ले इराणच्या टॉप नेतृत्वाच्या ठिकाणांवर केंद्रीत होते. तेहरानच्या संवेदनशील भागांवर निशाणा साधल्याचेही वृत्त आहे. खामेनेई यांच्या निवासस्थानाजवळ स्फोटांचे आवाज ऐकू आल्याचा दावाही करण्यात आला आहे. मात्र इराणी सरकारी माध्यमांनी नुकसान किंवा त्यांच्या ठिकाणाबाबत ठोस माहिती दिलेली नाही.
advertisement
खामेनेईंच्या ठिकाणाबाबत सस्पेन्स का?
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक व्हिडिओ जारी करून हल्ल्यांची पुष्टी केली आहे. त्यांनी हा मोठा आणि सुरू असलेला अभियान असल्याचे म्हटले आहे. अमेरिकन नागरिकांच्या सुरक्षेसाठी आणि संभाव्य धोक्यांचा नायनाट करण्यासाठी हे पाऊल उचलल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्या विधानानंतर आंतरराष्ट्रीय पातळीवर राजनैतिक हालचालींना वेग आला आहे. अनेक देशांनी संयम बाळगण्याचे आवाहन केले आहे.
advertisement
रॉयटर्सने एका इराणी अधिकाऱ्याच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार सर्वोच्च नेत्यांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. मात्र हल्ल्यावेळी ते मुख्यालयात होते का किंवा त्यांना दुखापत झाली का, याबाबत कोणतीही अधिकृत पुष्टी झालेली नाही.
तज्ज्ञांच्या मते इराणने अशा संकटाच्या परिस्थितीसाठी पर्यायी कमांड सेंटर्स आधीच तयार ठेवले आहेत. युद्ध किंवा बाह्य हल्ल्यांच्या वेळी शीर्ष नेतृत्वाला तात्काळ सुरक्षित स्थळी हलवणे ही लष्करी रणनीतीचा भाग असतो. सोशल मीडियावर अनेक दावे व्हायरल होत असले तरी त्यांची स्वतंत्र पुष्टी झालेली नाही.
advertisement
इतका गुप्ततेचा पडदा का?
इराणच्या राजकीय व्यवस्थेत सर्वोच्च नेता हा अंतिम निर्णयकर्ता असतो. युद्धस्थितीत त्यांची सुरक्षा ही सर्वोच्च प्राधान्याची बाब असते. त्यामुळे त्यांच्या हालचाली आणि ठिकाण सार्वजनिकपणे जाहीर केले जात नाही. लष्करी विश्लेषकांच्या मते माहिती जाणीवपूर्वक मर्यादित ठेवली जाते, जेणेकरून शत्रूला रणनीतिक फायदा मिळू नये. कधी कधी संभ्रम निर्माण करणेही हीच सुरक्षा यंत्रणेची रणनीती असू शकते.
advertisement
हल्ल्यांचा सत्तेवर परिणाम होऊ शकतो का?
हल्ले दीर्घकाळ सुरू राहिल्यास लष्करी आणि राजकीय निर्णय प्रक्रियेवर परिणाम होऊ शकतो. मात्र इराणने वर्षानुवर्षे बहुस्तरीय कमांड सिस्टीम उभारली आहे. त्यामुळे सर्वोच्च नेता तात्पुरते सार्वजनिकरित्या अनुपस्थित असला तरी शासन आणि लष्करी कारभार सुरू राहू शकतो. तात्काळ सत्तासंकटाची शक्यता कमी मानली जात असली तरी तणाव निश्चितच वाढणार आहे.
advertisement
संघर्ष मोठ्या प्रादेशिक युद्धात बदलू शकतो का?
विश्लेषकांच्या मते हा सर्वात मोठा धोका आहे. इराणकडून मोठ्या प्रमाणावर प्रत्युत्तर दिले गेले किंवा इतर प्रादेशिक शक्ती यात सहभागी झाल्या तर संघर्ष मर्यादित राहणार नाही. तेलबाजार, जागतिक व्यापार मार्ग आणि पश्चिम आशियातील सुरक्षा व्यवस्थेवर याचा थेट परिणाम होऊ शकतो. पुढील काही दिवस परिस्थिती नियंत्रणात राहते की व्यापक युद्धात परिवर्तित होते, हे ठरवणारे ठरणार आहेत.
advertisement
पुढे काय?
सध्याची परिस्थिती अत्यंत संवेदनशील आहे. जगभरातील सरकारे घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. कूटनीतिक तोडगा काढण्याचे प्रयत्नही सुरू असल्याची चर्चा आहे. जर तणाव कमी झाला नाही, तर हा संघर्ष केवळ लष्करी टकराव न राहता जागतिक राजकीय संतुलनाची मोठी परीक्षा ठरू शकतो.
view comments
मराठी बातम्या/विदेश/
खामेनेईंच्या निवासस्थानाजवळ स्फोट, तेहरान धगधगले; 'सुप्रीम लीडर' गायब होण्याने जागतिक राजकारणात खळबळ
Next Article
advertisement
4,000 कर्मचाऱ्यांची एका झटक्यात हकालपट्टी, 'क्रूर' पॅटर्न आता जगभर लागू होणार; मालकाचे खळबळजनक विधान, म्हणाला- हळूहळू काढण्यापेक्षा मी एकदाच...
4,000 कर्मचाऱ्यांची एका झटक्यात हकालपट्टी, 'क्रूर' पॅटर्न आता जगभर लागू होणार
  • सर्वात भयानक काळ सुरू

  • 'क्रूर' निर्णयाने कर्मचारी सुन्न

  • 4,000 कुटुंबांची चूल विझली

View All
advertisement