advertisement

Israel Iran News: अमेरिकेने वचन पूर्ण केलं, आता इराण कधीही अणूबॉम्ब... हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांची पहिली प्रतिक्रिया

Last Updated:

Israel Attack : इस्त्रायलच्या हल्ल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रतिक्रिया देत इराणला इशारा दिला आहे.

Donald Trump
Donald Trump
Israel Iran News :  इस्त्रायलनं इराणवर मोठा हल्ला केला आहे, गेल्या काही दिवसांपासून अमेरिका आणि इराण यांच्यात मोठा तणाव बघायला मिळाला. अखेर इराणवर अत्यंत मोठा हल्ला करण्यात आला अमेरिका आणि इस्त्रायलने मिळून हा हल्ला केला. तेहरानमधील तीन ठिकाणी स्फोटांचा आवाज ऐकू आला. तेहरानच्या मेहराबाद विमानतळावर हल्ला करण्यात आला आहे. इस्त्रायलनं इराणवर 100 क्षेपणास्त्र डागली आहेत. इराणच्या 30 ठिकाणी हल्ला करण्यात आल्याचा दावा ईस्त्रायलच्या मीडियानं केलाय..यामध्ये राष्ट्रपतींचं निवासस्थान आणि लष्करी गुप्तचर यंत्रणेचा समावेश आहे. इस्त्रायलच्या हल्ल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रतिक्रिया देत इराणला इशारा दिला आहे. अमेरिकेनं आपलं वचन पूर्ण केलंय असं ट्रम्प म्हणाले.
अमेरिकेने इराणवर इस्रायलसोबत संयुक्त हल्ले केलेत, असे अमेरिकन अधिकाऱ्याने अल जझीराला सांगितलंय. इराणकडून हल्ल्याची भीती होती त्यामुळे इराणवर हल्ला केल्याचं इस्त्रायलनं म्हटलं आहे. प्रत्युत्तराच्या हल्ल्याच्या भीतीने इस्रायलने आधीच आपल्या नागरिकांना बंकरमध्ये राहण्याचे आदेश दिले आहेत. इस्रायलने विशेष आणीबाणीची घोषणा केली आहे. इस्रायलमधील शाळांना सुट्टी घोषीत करण्यात आली आहे. इस्रायलनं या ऑपरेशनला लायन्स रोअर असं नाव दिलं आहे.
advertisement

डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा

अणुशस्त्रांबाबत इराण आणि अमेरिका यांच्यात सुरू असलेल्या वाटाघाटींदरम्यान हा हल्ला झाला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवर हल्ला करण्याची धमकी दिली होती. अमेरिकेनं आपलं वचन पूर्ण केलं आहे. इराण कधीही अणूबॉम्ब बनवू शकत नाही असा इशारा ट्रम्प यांनी दिला आहे. आम्ही इराणची मिसाईल्स उद्धवस्त करून टाकू...इराणचं नौदल उद्ध्वस्त करून टाकू असा कडक इशारा ट्रम्प यांनी दिला आहे.
advertisement

काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?

  • इराणमध्ये व्यापक लष्करी मोहिमा सुरू
  • अमेरिकन नागरिकांचं संरक्षण हे हल्ल्याचं प्रमुख ध्येय
  • अमेरिकेतील लोकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य
  • इराणकडून उद्भवणाऱ्या धोक्यांमुळे कारवाई
  • इराणच्या सत्ताधारी व्यवस्थेकडून अमेरिकेला धोका
  • इराणला अण्वस्त्र प्राप्त करू दिलं जाणार नाही
  • अण्वस्त्र प्रसार रोखणं हा अमेरिकेच्या धोरणाचा भाग
  • राष्ट्रीय सुरक्षेवर भर देणार
  • संभाव्य शत्रूराष्ट्रांविरुद्ध कठोर भूमिका घेण्याची तयारी
  • अमेरिकन जनतेला सुरक्षिततेबाबत विश्वास देण्याचा प्रयत्न
advertisement

इस्त्राइलचे पंतप्रधान नेत्यानाहू काय म्हणाले? 

इस्त्राइल आणि अमेरिकेनं इराणवर संयुक्त हल्ला केल्याची इस्त्राइलचे पंतप्रधान नेत्यानाहू यांची माहिती दिली आहे. इराणचा आण्विक कार्यक्रम संपवावाच लागेल. स्वतंत्र आणि शांत इराण तयार करावाच लागेल, असंही वक्तव्य केलं आहे
view comments
मराठी बातम्या/विदेश/
Israel Iran News: अमेरिकेने वचन पूर्ण केलं, आता इराण कधीही अणूबॉम्ब... हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांची पहिली प्रतिक्रिया
Next Article
advertisement
4,000 कर्मचाऱ्यांची एका झटक्यात हकालपट्टी, 'क्रूर' पॅटर्न आता जगभर लागू होणार; मालकाचे खळबळजनक विधान, म्हणाला- हळूहळू काढण्यापेक्षा मी एकदाच...
4,000 कर्मचाऱ्यांची एका झटक्यात हकालपट्टी, 'क्रूर' पॅटर्न आता जगभर लागू होणार
  • सर्वात भयानक काळ सुरू

  • 'क्रूर' निर्णयाने कर्मचारी सुन्न

  • 4,000 कुटुंबांची चूल विझली

View All
advertisement