Weekly Horoscope: सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक राशींचे साप्ताहिक राशीफळ! होळीनंतर येणार डबल गुडन्यूज, पण..
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Weekly Horoscope: मार्च महिन्याचा पहिला आठवडा होळीने सुरुवात होत आहे. या आठवड्यातील ग्रह-नक्षत्रांची स्थिती राशीचक्रावर परिणाम दाखवेल. पहिल्या आठवड्यातील ग्रहस्थितीवरून सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक राशींचे साप्ताहिक राशीभविष्य जाणून घेऊ.
advertisement
सिंह राशीच्या लोकांच्या वरिष्ठांच्या मदतीने जुन्या समस्या सुटतील आणि तुमचं कौतुक होईल. उत्पन्नाचे नवीन मार्ग सापडतील आणि बँकेतली पुंजी वाढेल. उत्तरार्धात कामाच्या पद्धतीत थोडे बदल करावे लागतील. व्यापाऱ्यांनी पैशांचे व्यवहार करताना थोडी काळजी घ्यावी. भावंडांशी प्रेम टिकून राहील. घरात एखाद्या यशामुळे सेलिब्रेशनची तयारी होईल. प्रेमात असलेल्यांची जवळीक वाढेल.लकी कलर: नारंगी, लकी नंबर: 3
advertisement
कन्या - कन्या राशीसाठी हा आठवडा थोडा संमिश्र असेल. सुरुवातीला तब्येत थोडी नरम-गरम राहू शकते. ठरवलेल्या कामात उशीर झाल्यामुळे तुमचं मन अस्वस्थ होईल आणि चिडचिड वाढेल. आरोग्य आणि नात्यांच्या बाबतीत थोडा ताण येऊ शकतो. मुलांशी काही कारणावरून खटका उडू शकतो. पैशांच्या बाबतीत हात आखडता घ्या, नाहीतर आर्थिक ओढाताण होईल. नोकरी करणाऱ्या महिलांना घर आणि ऑफिसमध्ये ताळमेळ राखताना दमछाक होईल.
advertisement
advertisement
तूळ - तूळ राशीच्या लोकांना कष्टाच्या मानाने थोडं कमी फळ मिळाल्यासारखं वाटेल, ज्यामुळे मन थोडं उदास होईल. कामातले अडथळे आणि घरच्यांचा पाठिंबा न मिळणं यामुळे चिंता वाढेल. यशासाठी कोणताही चुकीचा रस्ता निवडू नका, नाहीतर मोठी अडचण येऊ शकते. व्यवसायात असाल तर जिथे पैसा अडकून पडेल अशा ठिकाणी गुंतवणूक करू नका. अनुभवी लोकांचा सल्ला घेतल्याशिवाय कोणताही मोठा निर्णय घेऊ नका. नोकरीत स्वतःची कामं दुसऱ्यावर सोडू नका. नवीन नोकरी असेल तर बॉसचा मूड ओळखून काम करा, नाहीतर सर्वांसमोर ओरडा खावा लागेल. वडिलांच्या आणि स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या.लकी कलर: पांढरा, लकी नंबर: 1
advertisement
advertisement







